श्री शिवाजी महाविद्यालयात ८ जानेवारीला राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, डिसेंबर २९, २०२१

श्री शिवाजी महाविद्यालयात ८ जानेवारीला राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धाश्री शिवाजी महाविद्यालयात ८ जानेवारीला राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा

राज्यभरातील स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी होणारराजुरा__ श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा व माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने ८जानेवारीला शनिवारी सकाळी १० वाजता राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.एकीकडे वादविवाद स्पर्धा बाद होत असताना वादविवाद स्पर्धेतून नवीन विषय पोटतिडकीने समाजापुढे मांडता यावा,यासाठी "वाढत्या महागाईला व बेरोजगारीला शासनाचे धोरण जबाबदार आहे".या विषयावर वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.८ जानेवारीला श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सकाळी १० वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.प्रथम पुरस्कार
(पाच हजार रुपये)
इंपिरियल क्लासेस राजुरा कडून तर स्मृती चिन्ह संदीप खोके तर्फे,
द्वितीय पुरस्कार(चार हजार रुपये) आणि स्मृती चिन्ह
स्व. काशिनाथ केशवराव ढुमने स्मृती प्रित्यर्थ किरण ढुमने
एल.आय.सी.डेव्हलपमेंट ऑफिसर यांचे तर्फे,तृतीय पुरस्कार(तीन हजार रुपये)आणि स्मृती चिन्ह
आर. के. बुक डेपो राजुरा कडून तर प्रोत्साहन पर प्रथम(एक हजार रुपये) आणि स्मृती चिन्ह
प्रभारत्न होम डेकोरे,राजुरा केतन जुनघरे यांचे तर्फे,
प्रोत्साहन पर द्वितीय (एक हजार रुपये) व स्मृती चिन्ह रमेश झाडे ग्राम पंचायत सदस्य रामपूर यांचे कडून प्रोत्साहन पर तृतीय पुरस्कार(एक हजार रुपये) व स्मृती चिन्ह आई ड्राईव्हींग स्कुल तर्फे अमोल राऊत कडून
सर्व स्पर्धकांना देण्यात येणार आहे. प्रथम पाच हजार,द्वितीय पुरस्कार चार हजार,तृतीय पुरस्कार तीन हजार , प्रोत्साहनपर पुरस्कार प्रत्येकी एक हजार रुपयांचे तीन पुरस्कार देण्यात येणार आहे.असे स्पर्धेच्या पुरस्काराचे स्वरूप असून विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.त्यामुळे राज्यभरातील स्पर्धकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अविनाश दोरखंडे(९२२६७५३२३२) बादल बेले (८२०८१५८४२८ ) प्रा.डॉ.संतोष देठे (९९७५३४४२९६)प्रा.डॉ.नागनाथ मनुरे (९९६०१३१२०)प्रा.राजेश्वर चाफले (९९७५६०२९७४) प्रा.सुयोग साळवे(८३२९९१४७२४) या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन राजुरा येथील श्री शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. एम. वारकड व माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अविनाश दोरखंडे यांनी केले आहे.