मेडिक्वीन एक्सलन्स पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. स्नेहल पोटदुखे यांचा तेली समाज तथा उत्कृष्ट महिला मंचतर्फे सत्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०७ डिसेंबर २०२१

मेडिक्वीन एक्सलन्स पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. स्नेहल पोटदुखे यांचा तेली समाज तथा उत्कृष्ट महिला मंचतर्फे सत्कार

#snehalpotdukhe


चंद्रपूर-  येथील डॉ. स्नेहल प्रसाद पोटदुखे यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उत्कृष्ट समाजकार्यासाठी राजभवन येथे 'मेडीक्वीन एक्सलन्स' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या बद्दल तेली समाज तथा उत्कृष्ट महिला मंचतर्फे सत्कार करण्यात आला. 


महिलांच्या आरोग्यासाठी कार्य करणाऱ्या मेडीक्वीन या संस्थेतर्फे महिला डॉक्टरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात चंद्रपूर शहरातील डॉ. स्नेहल पोटदुखे यांचा सत्कार करण्यात आला. या बद्दल झोन सभापती, तथा उत्कृष्ट महिला मंच अध्यक्ष सौ. छबुताई वैरागडे, प्रा. सौ.स्नेहल बांगडे, सौ. साक्षी कार्लेकर , सौ. पूजा पडोळे, सौ, प्रणिता जुमडे, सौ,सारिका भुते, सौ, सुवर्णा लोखंडे, सौ, अर्चना चहारे, सौ.  विद्या बुरटकर यांनी अभिनंदन केले.


#snehalpotdukhe