सोमवारी आ. सुधीर मुनगंटीवार करणार शहरातील श्री अंचलेश्वर मंदिरात अभिषेक व पूजाअर्चा | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

१२ डिसेंबर २०२१

सोमवारी आ. सुधीर मुनगंटीवार करणार शहरातील श्री अंचलेश्वर मंदिरात अभिषेक व पूजाअर्चा |

सोमवार, दिनांक १३ डिसेम्बर रोजी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या शुभहस्ते श्री काशी विश्वनाथ धाम लोकार्पण सोहळा होणार आहे.  या पार्श्वभूमिवर चन्द्रपुरातील श्री अंचलेश्वर मंदिरात आ. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) अभिषेक व पूजाअर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सोमवारी काशी विश्वनाथ धामच्या लोकार्पणाचा सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. यानिमित्त भाजपच्या वतीने प्रमुख नेत्यांच्या हस्ते स्थानिक स्तरावर पूजन कार्यक्रम घेणार आहेत. चन्द्रपुरातील श्री अंचलेश्वर मंदिरात (Shri Anchaleshwar temple) सकाळी ९.३० ते दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यक्रम होणार आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाने केले आहे. 

@SMungantiwar#abhishek #Anchaleshwar #temple 

Anchaleshwar Temple & Fort
Chandrapur, maharashtra, India