चंद्रपूर जिल्‍हयासाठी १५० नवीन बसेस त्‍वरित उपलब्‍ध करा : आमदार सुधीर मुनगंटीवार @smungantiwar - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२९ डिसेंबर २०२१

चंद्रपूर जिल्‍हयासाठी १५० नवीन बसेस त्‍वरित उपलब्‍ध करा : आमदार सुधीर मुनगंटीवार @smungantiwar

चंद्रपूर जिल्‍हयासाठी १५० नवीन बसेस त्‍वरित उपलब्‍ध करा : आमदार सुधीर मुनगंटीवार यांची परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे मागणी चंद्रपूर जिल्‍हयासाठी १५० बसेस उपलब्‍ध करण्‍याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांची परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली.  मुनगंटीवार म्हणाले, मी अर्थमंत्री असताना राज्‍य परिवहन महामंडळाला ७०० बसेस उपलब्‍ध करुन दिल्‍या आहेत. त्‍यातील २०० बसेस चंद्रपूर जिल्‍हयासाठी उपलब्‍ध करुन देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला होता. मात्र, त्‍यापैकी ५० बसेस उपलब्‍ध करुन नस्‍तीवर लिहिलेल्‍या शे-याची अंमलबजावणी झाली नाही. चंद्रपूर जिल्‍हयासाठी १५० बसेस अध्‍याप उपलब्‍ध झालेल्‍या नाहीत. त्‍या त्‍वरित उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍या, अशी मागणी केली. चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या मुल तालुक्‍याच्‍या मुख्‍यालयी मुल येथे राज्‍य परिवहन महामंडळाचे स्‍वतंत्र आगार मंजुर करण्‍यात यावे अशी मागणी मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. या विषयासंदर्भात लवकरच एक बैठक आयोजित करुन सकारात्‍मक निर्णय घेण्‍यात येईल असे आश्‍वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले.