स्थानिक स्वराज्य संस्था वॉर्ड रचनेबाबत सरकारचा निर्णय तुघलकी : आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत टीका - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२७ डिसेंबर २०२१

स्थानिक स्वराज्य संस्था वॉर्ड रचनेबाबत सरकारचा निर्णय तुघलकी : आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत टीका


स्थानिक स्वराज्य संस्था वॉर्ड रचनेबाबत सरकारचा निर्णय तुघलकी : आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत टीकादोन नगरसेवकांचा प्रभाग पुर्वीपासूनच योग्य निर्णय होता. परंतु महाविकास आघाडी सरकारने भीतीपोटी हा निर्णय फिरविला. स्थानिक स्वराज्य संस्था वॉर्ड रचनेबाबत सरकारने तुघलकी निर्णय घेतल्याची टीका महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केला. 27 डिसेंबर रोजी विधानसभेत शासकीय विधेयकावरील चर्चेदरम्यान ते बोलत होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये थेट नगराध्यक्ष निवडीची पद्धत भाजप सरकारने सुरू केली होती. परंतु महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय फिरविला. यामागे पूर्णपणे राजकीय हेतू होता. या निर्णयातून जनतेचे नुकसान होत आहे. वॉर्डांची पुनर्रचना करताना आमदारांची समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.