विद्युत केंद्रामुळे होणा-या प्रदुषणावर प्रतिबंध घालण्‍याबाबत जानेवारीत बैठक @smungantiwar #chandrapur - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२९ डिसेंबर २०२१

विद्युत केंद्रामुळे होणा-या प्रदुषणावर प्रतिबंध घालण्‍याबाबत जानेवारीत बैठक @smungantiwar #chandrapur

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामुळे होणा-या प्रदुषणावर प्रतिबंध घालण्‍याबाबत जानेवारीत बैठक घेणार – आ. सुधीर मुनगंटीवार यांचे चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्‍या बैठकीत आश्वासन



चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामुळे होणारे प्रदुषण व त्‍यामुळे नागरिकांच्‍या आरोग्‍यावर होणारे विपरित परिणाम ही अतिशय गंभीर बाब आहे. या प्रदुषणावर प्रतिबंध घालण्‍याच्‍या दृष्‍टीने जानेवारी महिन्‍यात सर्व संबंधीत अधिका-यांची बैठक आयोजित करुन उपाययोजनेची दिशा निश्चित करु, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


चंद्रपूर बचाव संघर्ष समिती चंद्रपूरचे पदाधिकारी व चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्‍य अभियंता श्री. सपाटे यांच्‍या समवेत आ. मुनगंटीवार यांनी हिराई विश्रामगृहात २९ डिसेंबरला बैठक घेतली.

चंद्रपूर हे देशातील सर्वाधीक प्रदुषीत शहरांमध्‍ये गणले जाते. त्‍यामुळे या प्रदुषणावर प्रतिबंध घालण्‍याची नितांत आवश्‍यकता असल्‍याचे समितीचे पदाधिकारी म्‍हणाले. आ. मुनगंटीवार यांनी समितीच्‍या पदाधिका-यांच्‍या मागण्‍या ऐकुन घेतल्‍या व या संदर्भात जिल्‍हाधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्‍य महाप्रबंधक यांची संयुक्‍त बैठक घेवुन उपाययोजना बाबत चर्चा करु असे आश्‍वासन समितीच्‍या पदाधिका-यांना दिले.


यावेळी डॉ. गोपाल मुंधळा, डॉ. मंगेश गुलवाडे, विजय चंदावार, रामपाल सिंह, उमाकांत धांडे, प्रिती भुषणवार, डॉ. स्‍वपन दास, सुबोध कासुलकर आदींची उपस्थिती होती.