शिंदे विद्यालयात 'राष्ट्रीय गणित' दिन साजरा - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, डिसेंबर २३, २०२१

शिंदे विद्यालयात 'राष्ट्रीय गणित' दिन साजराशिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
: भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय, चिचोंडी येथे थोर गणित तज्ञ रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त शासन परिपत्रक प्रमाणे 'राष्ट्रीय गणित दिन' साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी गणित मेळावा, गणितांचे विविध मॉडेल्स, गणितीय रांगोळी स्पर्धा, गणित प्रश्नमंजुषा इत्यादी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची गोडी निर्माण व्हावी, त्यांची गणिता विषयीची अनामिक भीती दूर व्हावी, भविष्यातील दैनंदिन जीवनातील गणित विषयाचे महत्त्व ह्याविषयी विद्यार्थ्यांना सखोल महत्त्व मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे व गणित प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यांनी केले. कु. सानिया पेंदाम, कु. उताणे, मानसी पिंपळकर, सचिन देठे, कु. कोमल आखाडे, सृष्टी
कौरासे, साहेबा शेख, पायल तोडासे, प्राची तांदूळकर, चैताली सोनुलकर, साहिली दाते , इत्यादी विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनील देशमुख सर तर आभार प्रदर्शन उमेश पाटील सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.