नापिकी व कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; ब्रम्हपुरी तालुक्यातील खरकाडा येथील घटना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०९ डिसेंबर २०२१

नापिकी व कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; ब्रम्हपुरी तालुक्यातील खरकाडा येथील घटना
ब्रम्हपुरी (विनोद चौधरी) : सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून ब्रह्मपुरी तालुक्यातील खरकाडा येथील किसन मारुती दहीकार वय पन्नास वर्ष या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 9 डिसेंबर ला पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
खरकाडा येथील किसन दहिकर हे कर्ज आणि सततच्या नापिकीमुळे चिंताग्रस्त होते. त्यामुळे त्यांची मानसिकता खचली होती. गुरुवारला दुपारच्या सुमारास किसन दहिकर सायकलने घरातून बाहेर निघाले होते. सायंकाळी घरी परत न आल्याने घरच्यांनी आजूबाजूला गावात शोधाशोध घेतली मात्र ते आठळून आले नाही . 9 डिसेंबर ला पहाटेच्या सुमारास किसन मारुती दहीकार यांनी स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपविली असल्याचे नागरिकांना आढळून आले. सोसायटीच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे शेतकऱ्यानेआढळलेल्या चिट्ठीत लिहून ठेवले. त्यांच्यावर सेवा सहकारी संस्थेमार्फत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा चौगानचे  34 हजार रुपयांचे कर्ज  आहे. त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस करीत आहेत.