बाबुपेठ परिसरात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

१२ डिसेंबर २०२१

बाबुपेठ परिसरात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी
चंद्रपुरातील बाबुपेठ परिसरात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुधा दि. ०८-१२-२०२१ ला बाबूपेठ येथे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज तैलिक समाज मंडळाचा वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोहत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सकाळी 10 वाजता पूजा , सकाळी 11 वाजता रक्तदांन शिबिर, दुपारी 1 वाजता रांगोळी स्पर्धा व 2 वाजता चित्रकला स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर विधानसभा चे आमदार किशोर भाऊ जोरगेवार. उद्घाटक प्रा. डॉ. नामदेव वरभे माझी सिनेट सदस्य नागपूर आणि गोंडवाना विद्यापीठ. कार्यक्रमाची प्रमुख उस्थितीमध्ये प्रा. सौ. नेत्राताई बेले उप प्राचार्य एफ . ई गर्ल्स कॉलेज चंद्रपूर. सौ कल्पना ताई बागुलकर नगरसेविका. नगरसेवक श्री प्रदीप भाऊ किरमे व पाहुणे मंडळी यांची उपस्थिती होती तसेच मान्यवरांचे हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला व मार्गदर्शन लाभले. महत्वाचे म्हणजे तैलिक समाज मंडळ, बाबुपेठ तर्फे श्री. किशोरभाऊ जोरगेवार, आमदार चंद्रपूर विधानसभा यांना दिनांक 8 डिसेंबर या तारखेला संताजी जगनाडे महाराज यांची जयंती सर्व महत्वाचे वार्षिक कॅलेंडर मध्ये दर्शविण्यात यावी असे निवेदन देण्यात आले. सदर जयंती महोत्सव आयोजित करण्यात श्री. श्रावणजी खनके श्री. सुरेशराव वैरागडे श्री. प्रवेश बुटले,श्री. गणेश पोहाने, श्री. नितीन बुटले, श्री. विश्वास इटनकर, श्री. प्रदीप खनके , श्री. सचिन धोपटे, श्री. गणेश चन्ने, श्री. योगेश कामडी
श्री. आशिष वैरागडे, श्री. प्रफुल डफ, श्री. विजय खनके, सौ. चंदाताई वैरागडे, सौ. स्नेहल अंबागडे, सौ. रुपालीताई अंबटकर,सौ. सुरेखा बुटले, सौ. रुपाली बुटले, सौ. मीनल खणके यांनी महत्वाचे योगदान दिले.