संताजीच्या रथयात्रेचे भद्रावतीत जल्लोषात स्वागत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२६ डिसेंबर २०२१

संताजीच्या रथयात्रेचे भद्रावतीत जल्लोषात स्वागत


शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
: तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्मगाव असलेल्या सदुंबरे येथून निघालेली संताजीची रथयात्रा संपुर्ण महाराष्ट्रात भ्रमण करत आहे. या रथयात्रेत निमित्त " समाज जोडो अभियान" हा उद्देश ठेवून ही रथयात्रा मागील अठरा दिवसापासून महाराष्ट्रात विविध भागात भ्रमण करत आहे. आज भद्रावती येथे संत जगनाडे महाराज यांच्या रथयात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी यावेळी ढोल-ताशांच्या आवाजात, संत जगनाडे महाराज की जय या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमत होतं. या रथयात्रेचे स्वागत संताजी स्नेही मंडळाचे अध्यक्ष श्री किशोर गाठे, सचिव श्री सुरेश मस्के, कार्यकारिणी सदस्य व असंख्य समाजबांधवांनी केले. स्वागत झाल्यानंतर भद्रावती येथील संताजी नगर मध्ये असलेल्या संताजी मंदिरापर्यंत ही रथयात्रा पोहोचली. यावेळी मोठ्या संख्येत समाज बांधव उपस्थित होते.
संताजीच्या मंदिरात रथयात्रे सोबत असलेले श्री नरेंद्रजी चौधरी रथयात्रेचे प्रणेते, लाल चौधरी सेवा आघाडी तथा संपर्कप्रमुख, श्रीहरी सातपुते विभागीय अध्यक्ष युवा आघाडी,संजय खाटीक विभागीयसचिव, गजानन अगळे, ईश्वर डुकरे या मान्यवरांच्या हस्ते संताजी चे पूजन करून समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले.
रथयात्रेचे प्रणेते श्री नरेंद्रजी चौधरी यांनी मार्गदर्शन करताना समाजाने एकत्र होणे ही काळाची गरज असून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, ओबीसी आरक्षणासाठी, आपण रस्त्यावर उतरले पाहिजे असे मार्गदर्शन केले. तर श्री गजानन आगळे यांनी की संताजी महाराज नसते तर तुकारामाची गाथा आपल्याला दिसली नसती, त्यांना ती मुखोद्गत असल्या मुळे त्यांनी ती लिहून काढली असे सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संताजी स्नेही मंडळाचे अध्यक्ष श्री किशोर गाठे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुधीर मोते तर आभार प्रदर्शन सौ सुनीता बेलखेडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. ज्ञानेश हटवार, पुरुषोत्तम नैताम, विनोद बाळेकरमकर, गोपाल गायकवाड, सुधीर पारधे, योगेश खोबरागडे, प्रशांत झाडे, महिला भगिनी इत्यादी अनेक समाज बांधवांनी सहकार्य केले.