सौ.मालती सेमले यांच्या "रानपाखरं" बालकाव्यसंग्रहाचे प्रकाशन | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०६ डिसेंबर २०२१

सौ.मालती सेमले यांच्या "रानपाखरं" बालकाव्यसंग्रहाचे प्रकाशन |निफन्द्रा(प्रतिनिधी)

दि.३,४ व ५ डिसेंबर ला पार पडलेल्या ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील चंद्रकांत महामिने पुस्तक प्रकाशन मंचवर दिनांक 4 डिसेंबर २०२१रोज शनिवार ला  डॉ.बळवंत भोयर,डॉ.विद्याधर बन्सोड ,डॉ.विशाखा कांबळी ,श्री नरेशकुमार बोरिकर श्री संतोष उईके व इतर उपस्थितांच्या हस्ते सौ मालती भास्कर सेमले यांच्या रानपाखरं या दुसऱ्या बालकाव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. रानपाखरं हे बालकाव्यसंग्रह विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला चालणा देणारे व आकर्षक सचित्री आहे. या पुस्तकाला प्रस्तावना सुप्रसिद्ध कवी लेखक गीतकार ,दादासाहेब फाडके पुरस्कार प्राप्त प्राचार्य डॉ.गोविंद गायकी बुलढाणा यांनी लिहले आहे आणि  मलपृष्ठावरील मजकूर जेष्ठ साहित्य प्रभू राजगड नागपूर यांनी लेहले आहे .तसेच पुस्तकात आद.दिपेंद्र लोखंडे साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक चंद्रपूर यांनी कवितांचे वाचन करून शुभेच्छा संदेश दिलेला आहे.तसेच त्यांचे सागरमोती   हा काव्यसंग्रह व       बाग आम्हा मुलांची हा  बालकाव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.सौ.मालती सेमले ह्या  जि.प.चंद्रपूर अंतर्गत जि.प.उच्च प्राथ.शाळा मोखाळा पंचायत समिती सावली येथील सहाय्यक शिक्षिका या पदावर कार्यरत आहेत.सौ.मालती सेमले यांचे कौतुक सर्व स्तरातून केल्या जात आहे.


Publication of Mrs. Malati Semle's collection of children's poems 'Ranpakharam'