कामगारांच्या प्रश्नांना घेऊन प्रहार जनशक्ती चे कामगार आयुक्तांना निवेदन #प्रहार #prahar - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२१ डिसेंबर २०२१

कामगारांच्या प्रश्नांना घेऊन प्रहार जनशक्ती चे कामगार आयुक्तांना निवेदन #प्रहार #prahar

चंद्रपुरातील नवनिर्माण मेडिकल कॉलेजच्या इमारत बांधकामातील कामगारांच्या प्रश्नांना घेऊन प्रहार जनशक्ती चे कामगार आयुक्तांना निवेदन
चंद्रपुर येथे नवनिर्माण होत असलेल्या मेडिकल काँलेजच्या ईमारत बांधकामातील कंत्राटी कामगाराच्या विविध मागण्यांना घेऊन 21 डिसेंबर रोजी प्रहार जनशक्ती च्या कार्यकर्त्यांनी कामगार आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले.

कंत्राटी कामगारांना किमान वेतन न देणे, ओव्हरटाईम न देने , पुर्वसुचना न देता कामावरुण कमी करने,बँकेत पेमेंट न देता तो रोखीने देऊन कामगारांची फसवणूक करने अशा अनेक तक्रारी प्रहारचे महेश हजारे यांच्याकडे संबधीत कामागारांनी मांडल्या होत्या .
तेव्हा यापूर्वी तात्काळ दखल घेत साहायक कामगार आयुक्तांकडे तक्रार दिली. डबल ओटीसह काही कामगारांना 17 ते 18 लाख रुपये प्रहारने मिळवुन दिले. परंतु सुड भावनेतुन काही दिवसातच या सर्व कामगारांना कामावरुन कमी केले.
परंतु प्रहारच्या वतिने याचाही पाठपुरावा केला व संबधित शापुर्जी पालोण्जी कंपणीच्या हुकुमशाही आणी लुटारु व्यवस्थेच्या चौकशी ची मागणी कामगार आयुक्त यांच्याकडे करन्यात आली होती.
तेव्हा मा.कामगार आयुक्त मुंबई यांनी तात्काळ पांहणीची परवानी दिली.
दि. 1 डिसेंबर रोजी अप्पर कामगार आयुक्त कार्यालय नागपुर यांच्या टिमने कामाच्या ठिकानी जाऊन पाहणी केली. तेव्हा त्यात अनेक त्रुटी आढळुन आल्या व सदर अहवाल 7 दिवसाच्या आत साहयक कामगार आयुक्त कार्यालय चंद्रपुर येथे दाखल करन्याचे लेखी आदेश शापुर्जी च्या प्रोजेक्ट हेडला दिले.

परंतु पुन्हा सतत टाळाटाळ करत शापुर्जी पालोण्जी कडुन कुठलेही ठोस लेखी ऊत्तर मिळाले नाही..

दि.21 डिसेंबर रोजी प्रहारचे महेश हजारे यांनी साहयक कामगार आयुक्त जानकी भुईटे यांची भेट घेतली. परंतु भुईटे मँडम याबाबतीत जानीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचे लक्षात आले. जानीवपुर्वक कामगारांची फसवणूक झाल्यास कार्यवाही जर झाली नाही तर साहायक कामगार आयुक्त कार्यालय चंद्रपुर यांना प्रहार स्टाईलने ऊत्तर देऊ असा इशारा प्रहारचे महेश हजारे यांनी साहायक कामगार आयुक्त भुईटे यांना दिला.