ओ.बि.सि बांधवांचा न्याय हक्कासाठी बसपाचे धरणे आंदोलन संपन्न - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२३ डिसेंबर २०२१

ओ.बि.सि बांधवांचा न्याय हक्कासाठी बसपाचे धरणे आंदोलन संपन्न


शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
: बहुजन समाज पार्टी जिल्हा चंद्रपूरच्या वतीने दिनांक 22 डिसें 2021 बुधवार ला ठीक सकाळी 11.00 वाजता महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.ऍड.संदीपजी ताजने साहेब यांचा आदेशाने बसपा तर्फे राज्यव्यापी आंदोलनाचा निर्देश देण्यात आले आणि जिल्हा अध्यक्ष मा. मुकद्दर मेश्राम साहेब चंद्रपुर जिल्ह्यात यांचा मार्गदर्शनात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमधील OBC बांधवांचे आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे गमावण्याची वेळ आली आहे. OBC बांधवांच्या न्याय हक्कासाठी बहुजन समाज पार्टी रस्त्यावर उतरून समाज बांधवांवरील अन्यायाला वाचा फोडेल. या करिता जिल्हाधिकारी चंद्रपूर कार्यालयावर कोरोना नियमाचे कटाक्षाने पालन करीत कायदा–सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची काळजी घेत जिल्हा उपाध्यक्ष विशाल बोरकर, जिल्हा महासचिव सुभाष पेटकर, जिल्हा सचिव विनित एस.तावाडे, जिल्हा महिला संयोजिका श्री. मनीषा नैताम मॅडम, झोन प्रभारी नवानंद खंडाळे, भास्कर कामटकर, जिल्हा सदस्य धर्मेश नकोसे, शहर अध्यक्ष चंद्रपूर शिरीज गोगुलवार, शहर अध्यक्ष बल्लारपूर आसिफ शेख, जिल्हा सचिव प्रमोद कोल्हे, जिल्हा सचिव रत्नाकर साठे, प्रशांत रामटेके व इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होवून जिल्हाधिकारी मा. गुल्हाने साहेब यांचा मार्फत राज्य सरकराला निवेदन सादर करून बसपा च्या मागण्या शासन दरबारी पोहचविण्यात आले.