नगरपालिका तर्फे घंटागाडी चालकांचा सत्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०८ डिसेंबर २०२१

नगरपालिका तर्फे घंटागाडी चालकांचा सत्कार


शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
:शहराला चांगल्या सवयी व नाविन्यपूर्ण उपक्रम हा सर्वोत्कृष्ट शहराचा पुरस्कार प्राप्त झाला तसेच कचरामुक्त शहर म्हणून वन स्टार नामांकन भद्रावती ला प्राप्त झाले हा सन्मान सर्वांसोबत वाटून घेण्यासाठी शहरातील घंटागाडी चालकांचा व कामगारांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. शहरातील समता महिला बचत गट व तनवी महिला बचत गट यांच्या माध्यमातून २४ प्रभागात १२ घंटागाडी कचरा उचलण्याचे काम करतात या गाड्यांवर चालक व कामगार असे २४ जण काम करतात. स्वच्छ सर्वेक्षणासाठी मोलाचा वाटा असल्यामुळ न.प. कार्यक्रमात नगराध्यक्ष अनिल धानोरकर, सुर्यकांत पिदुरकर मुख्याधिकारी, संतोष आमने उपाध्यक्ष यांनी रुक्साना शेख समता महिला बचत गट रंजना मोडक तनवी महिला बचत गटाचे अध्यक्षासह २४ जणांचा सत्कार केला.