वर्षभरात महावितरणचा १०७१ वीजचेारांना दणका #mseb - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२९ डिसेंबर २०२१

वर्षभरात महावितरणचा १०७१ वीजचेारांना दणका #mseb

१२ महिण्यात १ कोटी ८२ लाखांच्या वीजचोऱ्या पकडल्या

चंद्रपूर दिनांक २९ डिसेंबर २०२१

सरत्या वर्षात, महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातअंतर्गत, नोव्हेंबर २०२० नोव्हेंबर २०२१ या वर्षभराच्या कालावधित चंद्रपूर मंडल्‍ व गडचिरोली मंडलांतर्गत सहाही विभागात, वीजचोरीविरूध्द विविध मोहिमा राबविण्यात आल्या. या मोहिमांत चंद्रपूर व गडचिरेाली मंडलात एकंदरीत १ हजार ७२ वीजचोऱ्या पकडण्यात आल्या. या वीजचोरांनी एकंदरीत १ कोटी ८२ लाख रूपयांची वीजचोरी केल्याचे उघडकिस आले आहे. यात ५४२ वीजचेार हे आकडेबहाद्दर तर ५२९ वीजग्राहकांनी वीजेच्या मीटर्सषी छेडछाड करून वीजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या सर्व वीजचेारांनी एकंदरीत १४ लाख १४ हजार १६८ वीजेच्या युनिटसची वीजचेारी/बेकायदा वापर केला.                   

         वरोरा विभागात ३२ आकडा टाकूण वीज चोरणारे आकडे बहाद्दर व ५२ वीजमीटरर्सषी छेडछाड करणारे, बल्लारषा विभागात ३२ आकडा टाकूण वीज चोरणारे व ८६ वीजमीटरर्सषी छेडछाड करणारे, गडचिरोली विभागात १५२ आकडा टाकूण वीज चोरणारे आकडे बहाद्दर व ९३ वीजमीटरर्सषी छेडछाड करणारे, ब्रम्हपुरी विभागात ७७ आकडा टाकूण वीज चोरणारे आकडे बहाद्दर व ६७ वीजमीटरर्सषी छेडछाड करणारे तर  आलापल्ली विभागात २५१आकडा टाकूण वीज चोरणारे आकडे बहाद्दर व ६१ वीजमीटरर्सषी छेडछाड करणारे व चंद्रपूर विभागात १६८ वीजमीटरर्सषी छेडछाड करणारे असे एकंदरीत १ हजार ७१  वीजचेार या कारवाईत सापडले.  या सर्व वीजचोरांविरुध्द वीजकायदा २००३ च्या कलम १३५ व १३८ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून वीजचोरीची व तडजोड रक्कम वसुल करण्यात आली आहे. केल्या गेलेल्या वीजचेारीची व तडजोड रक्क्म न भरणाऱ्या ११ वीजचोरांविरोधात पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहे. संध्याकाळी, रात्री मुख्यत्वे आकडा टाकून व मीटर बायपास करुन करण्यात येणाऱ्या वीजचेारीवर करडी नजर ठेवण्यास महावितरणच्या विशेष चमू सर्वत्र कार्यरत आहेत.

       चंद्रपूर परिमंडळाअंतर्गत चंद्रपूर मंडलाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे व गडचिरोली मंडलाचे अधिक्षक अभियंता श्री. रविंद्र गाडगे यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर, वरोरा, बल्लारषा, आलापल्ली, गडचिरोली, ब्रम्हपुरी विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी वीजचोरी पकडण्याची कारवाई त्यांच्या उपविभागिय व शाखा अभियंता तसेच सहकाऱ्यांसोबत पार पाडली. वीजचोरी एक सामाजिक अपराध असून वीजचोरी करून कोळस्यासारख्या सिमित संसाधनापासून तयार होणारी वीज  चोरून वीजेचा बेकायदा वापर करणारे देशाच्या संपत्तीवरच घाला घालत असतात.  त्यामुळे वीजचोरीपासून प्रवृत्त होण्याचे, कायदेशीर मार्गाने वीज वापरण्याचे  तसेच वीजबील वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी केले आहे.