२४ डिसेंबर २०२१
Home
चंद्रपूर
#चंद्रपूर परिमंडळातील ७९ हजार ३०४ कृषिग्राहकांपैकी १८ हजार५९३ कृषिग्राहकांचे वीजबिल झाले कोरे #mseb
#चंद्रपूर परिमंडळातील ७९ हजार ३०४ कृषिग्राहकांपैकी १८ हजार५९३ कृषिग्राहकांचे वीजबिल झाले कोरे #mseb
४९ टक्के कृषिग्राहकांनी वीजबिल कोरे करण्याच्या दिशेने केला ३३ कोटी३४ लाख रुपयांचा भरणा
५१ टक्के कृषिपंप ग्राहकांना मार्च २०२२ पर्यंत कृषिपंपवीजबिलात ५० टक्केमाफीची सुवर्णसंधी
चंद्रपूर/दिनांक २४ डिसेबर
२०२१कृषिपंप वीजजोडणी व थकबाकीमध्ये सवलती संदर्भात स्वतंत्र धोरण कृषिपंप वीजजोडणी धोरण-महाकृषि उर्जा धोरण २०२० अंतर्गत कृषिपंपधारकांना वीजबिलात सवलत देण्याच्यायोजनेतून चंद्रपूर परिमंडलातील–चंद्रपूर व गडचिरेाली जिल्हयाचा समावेश असणा-या चंद्रपूर, वरोरा,चंद्रपूर, ब्रम्हपुरी, गडरिोली व आलापल्ली विभागातील आजापर्यंत एकंदरीत ३८ हजार ०८३ कृषिपंप ग्राहकांनी३३ कोटी ३४ लाख रुपयांचा भरणा करीत थकबाकीमुक्तिच्या दिशेने पाउुले टाकले आहेत तर १८ हजार ५९३ कृषिपंपधारकांनी १८ कोटी ८८ लाखाचा भरणा करुन आपलेवीजबिल कोरे करुन घेत या सुवर्णसंधीचा लाभ घेतला आहे. या सर्व कृषिग्राहकांना वीजबिल थकबाकीवर सूट, विलंब आकार व व्याज अशी एकत्रित ६० कोटी ४४ लाखांचीमाफी मिळाली आहे. सर्वथकबाकीमुक्त कृषिपंपधारकांना थकबाकीमुक्त होण्याचे प्रमाणपत्र महावितरणतर्फेदेण्यात आले आहेत.वर्षानुवर्षे पासून असलेल्या थकबाकीतूनकृषिपंपधारकांना फक्त निम्मी थकबाकी भरुन संपुर्णपणे थकबाकीमुक्तहोण्याची संधी मा. उर्जामंत्री डॉ. श्री.नितीन राउुत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या योजनेतून उपलब्ध झाली आहे.आपले वीजबिल शुन्य करुन घेत या सुवर्णसंधीचा लाभ घेणाऱ्या चंद्रपूर परिमंडळातीलकृषिपंपधारकांकडून भरल्या गेलेल्या यावीजबिलाच्या ३३कोटी ३४ लाखाच्या रक्कमेतून ६६ टक्के म्हणजेएकूण २२ कोटी हे कृषिग्राहकांच्या जिल्हयातील मुलभूत सुविधासांठी कृषिपंपधारकांनीच उपलब्ध करुन देतमहावितरणप्रति विश्वास दाखविला आहे. या योजनेच्या प्रतिपुर्तीसाठी व यशस्वितेसाठीमहावितरणचे अभियंता, कर्मचारी हे प्रत्यक्ष कृषिग्राहकांच्या बांधावर, घरीव ठिकठिकाणी मेळावे, तसेच सायकल रॅली आदी घेतयोजनेबददल समजावून सांगत याजनेत सामावून घेत आहेत. व योजनेस चांगला प्रतिसादही लाभतअसल्याचे चित्र आहे.
चंद्रपूर परिमंडलातील एकूण ७९ हजार ३०४ ग्राहकांना त्यांच्या सप्टेंबर २०२० पर्यंतच्या २३३ कोटीच्या वीजबिल थकबाकीवर १८ कोटी ६७ लाखाची सूट व सोबतच २१ केाटी ३३ लाख विलंब आकार व व्याज म्हणजे एकत्रितपणे ४० कोटी माफ होवून १९२ कोटी अशी सुधारीत थकबाकी निर्धारीत करण्यात आली आहे. या सुधारीत थकबाकीपैकी निम्मिच रक्कम म्हणजे ९६ कोटीच कृषिग्राहकांनी भरायचे आहेत. ९६ कोटीची वीजबिलमाफी, वीजबिल थकबाकीवर १८ कोटी ६७ लाखाची सूट व सोबतच २१ कोटी ३३ लाख विलंब आकार व व्याज म्हणजे एकत्रितपणे ४० कोटी असे एकत्रिपणे कधी नव्हे ती १३६ कोटीची माफी या योजनेमुळे चंद्रपूर व गडचिरेाली जिल्हयातील कृषिग्राहकांचे माफ होणार आहेत. आजपर्यंत ४९ टक्के कृषिग्राहकांनी थकबाकीमुक्त होण्याच्या दिशेने पाउुल टाकले. तसेच २३ टक्के कृषिग्राहकांनी कृषिविजबिलाचा भरणा करुण थकबाकी मुक्त होण्याचे म्हणजे वीजबिल कोरे करुण घेण्याची संधी साधली आहे.
मार्च २०२४ पर्यंत ही योजणा राबविण्यात येत असलीतरी या योजणेच्या पहिल्या वर्षी सुधारीतवीजबिलावर मार्च २०२२ पर्यंत ५० टक्के , मार्च २०२३ पर्यंत ३० टक्के तरमार्च २०२४ पर्यंत २० टक्के माफी मिळणार आहे. त्यामुळे दारात चालून आलेली हीसुवर्णसंधी न गमावता मार्च २०२२ पर्यंत ५० टक्के माफी मिळण्यास व यासंधीचा लाभ घेवून कृषिपंपधारकांनीथकबाकीमुक्तहोण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी कलेआहे.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
