नागपूर मनसेच्या आढावा बैठकीचे मेळाव्यात झाले रूपांतर:नांदगावकर साहेबांच्या मार्गदर्शनाने नागपुरातील महाराष्ट्रसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण @mns - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

१२ डिसेंबर २०२१

नागपूर मनसेच्या आढावा बैठकीचे मेळाव्यात झाले रूपांतर:नांदगावकर साहेबांच्या मार्गदर्शनाने नागपुरातील महाराष्ट्रसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण @mns

दिनांक ०९.१२.२०२१.
मनसे नेते मा.बाळा नांदगावकर साहेब नागपूर येथे खाजगी कामानिमित्त आले असता मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी काही वेळ दिल्यास कार्यकर्त्यांची एक बैठक लावतो अशी विनंती केली असता मा.नांदगावकर साहेबांनी ती विनंती लगेच मान्य केली.
अतिशय कमी वेळात नागपूरचे शहर अध्यक्ष अजय ढोके व विशाल बडगे , उपशहर अध्यक्ष प्रशांत निकम व रजनीकांत जिचकार,शहर सचिव श्याम पुनियानी व घनश्याम निखाडे, विभाग अध्यक्ष तुषार गिर्हे,उमेश बोरकर, शशांक गिरडे, चंदू लाडे, पिंटू बिसेन,उमेश उत्तखेडे, यांनी एक दिवसात तयारी करून या बैठकीचे आयोजन केले. लक्ष्मी नगर आठ रस्ता चौकातील *सायंटिफिक सभागृहात* सर्व पदाधिकारी यांनी उपस्थिती लावल्यावर या आढावा बैठकीचे मेळाव्यात रूपांतर झाले.*श्री.बाळा नांदगावकर साहेबांनी मनपा निवडणुकीसाठी सज्ज होणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, समोर कितीही नावाने मोठा व्यक्ती असला तरी हतबल न होता तुम्ही वर्षभर जे प्रामाणिक जनहितार्थ काम करता ते केलेले कर्मच निश्चितपणे फायदा करून देत असतं म्हणून मा.राजसाहेबांच्या विचारांचे कार्य सतत सुरू ठेवा, मेहनती शिवाय काहीच शक्य नाही, संघर्ष हा आपला आत्मा आहे. मनसेचे निस्वार्थी कार्यकर्ते हे आपलं बळ आहे, जिद्दीने कामाला लागा यश आपले आहेच. नाशिककरानी संधी दिल्यावर अल्प काळात केलेले मनसेचे काम आजही लोकांना माहीत आहे. नागपूरकर सुद्धा संधी देतील लोकांच्या संपर्कात राहा, असे सांगून अल्पवेळात बैठकीचे सुंदर आयोजन केल्याबद्दल हेमंत गडकरी, अजय ढोके ,विशाल बडगे व सहकारी पदाधिकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. आपल्या परिसरातील शाखांच्या माध्यमातून केलेले काम लोकांपर्यंत पोहचवा, नागपुरात आपले नगरसेवक नक्कीच निवडून येतील अशा आशावाद *मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी* यांनी व्यक्त करून प्रत्येक परिसरात मनसेच्या शाखा मजबूतीने उभ्या करा असे आवाहन गडकरी यांनी भरगच्च सभागृहात उपस्थित पदाधिकारी यांना केले.
 माजी शहर अध्यक्ष प्रवीण बर्डे यांनीही आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन शहर अध्यक्ष अजय ढोके यांनी तर आभार शहर अध्यक्ष विशाल बडगे यांनी केले. कार्यक्रमात शहरातील सर्व पुरुष व महिला पदाधिकारी उपस्थित होते.