Top News

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

    चंद्रपूर (प्रतिनिधी)-     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अल्पसंख्यांक समाजातील शिख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, नवबौद्ध युव...

ads

शनिवार, डिसेंबर ०४, २०२१

झुडपात लपून बसलेल्या बिबट्याने झडप घातली |बल्लारपूर (चंद्रपूर) : चंद्रपूरहून बल्लारपूरच्या दिशेने येत असताना दुपारी १२ च्या सुमारास पावर हाऊस जवळ झुडपात लपलेल्या बिबट्याने पोलिस उप विभागीय अविनाश पडोळे (Avinash Padole) यांच्यावर झडप घातली. या घटनेत पडोळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होता. मात्र, उपचाादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


आज दुपारच्या सुमारास बल्लारपूर शहराच्या प्रवेशद्वार जवळ पावर हाऊस शेजारी झुडपात लपून बसलेल्या बिबट्याने अविनाश पडोळे यांच्यावर झडप घातली. या हल्यात अविनाश पडोळे एम.एच. ३४- ए.टी - २०५७ दुचाकीसह खाली पडले. यात त्यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली.


पाठीमागून येणाऱ्या एका वाहनचालकाने धाव घेतल्याने बिबट झुडपात पळून गेला. त्यांच्यावर प्राथमिक उपचार ग्रामीण रुग्णालयात केल्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र, उपचाादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अविनाश पडोळे हे चंद्रपूर ठाण्यात वायरलेस विभागात पोलिस उप निरीक्षक पदावर कार्यरत होते. ते बल्लारपूर शहरातील महाराणा प्रताप वार्ड येथील रहिवाशी आहेत. पडोळे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


घटना स्थळा लगत लाखो रुपये खर्च करून देखणे असे स्वागत गेट तयार करण्यात आले आहेत. मात्र, परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढल्याने परिसरात वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. वाढली आहे. याकडे नगर परिषद आणि वनविभाग सर्रास दुर्लक्ष करीत आहे. यापूर्वीही या भागात अश्याप्रकराच्या घटना घडल्या असून सबंधित प्रशासनाला नागरिकांच्या जीवाची पर्वा नाही. असा आरोप शहरातील नागरिक करीत आहे.
पुलिस कर्मी पर तेंदुए का हमला , ASI की मौत हुई
 
बल्लारपुर - आज दोपहर करीब बारह बजे चंद्रपुर से आते एक पुलिस कर्मचारी पर पावर हाउस के पास स्थित पहले से घात लगाकर बैठे एक तेंदुए ने अचानक हमला करने से ए एस आई अविनाश पड़ोले नामक पुलिस कर्मी गंभीर घायल होने के बाद उपचार के दौरान मृत्यु होने की जानकारी आई है ।

अपनी डयूटी से वापसी या डयूटी जाने वाले पुलिस कर्मचारी ए एस आई अविनाश पडोले पर आज दोपहर करीब बारह बजे एक तेंदुए ने चलती बाईक क्रमांक एमएच ३४ AT 2057 सवार पर हमला किया जिससे घायल को तुरंत बल्लारपुर रुग्णालय में दाखिल किया गया उपचार के दौरान उसे चंद्रपुर जिला सामान्य रुग्णालय में रेफर किया है जहां इलाज के दौरान मौत हुई है इस घटना से परिसर में भय का वातावरण निर्माण है इस दुर्भाग्य पूर्ण घटना की जानकारी स्थानीय वनविभाग के अधिकारियों को नहीं है ,रात की बात छोड़ो अब दिन में चंद्रपुर बल्लारपुर आवागमन करते लोग कितने सुरक्षित है यह कह पाना मुश्किल है ।

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.