आमदार किशोर जोरगेवार यांनी मांडला चंद्रपूरच्या आरोग्यावर विधानसभेत प्रश्न - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२७ डिसेंबर २०२१

आमदार किशोर जोरगेवार यांनी मांडला चंद्रपूरच्या आरोग्यावर विधानसभेत प्रश्नकंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्याचे थकीत वेतन, महिलांसाठी १०० खाटांचे #रुग्णालय, नियमित औषध पुरवठा होण्यासाठी काय उपाययोजना करणार?


आमदार किशोर जोरगेवार यांनी मांडला चंद्रपूरच्या आरोग्यावर विधानसभेत प्रश्न

चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सोमवार, दिनांक 27 डिसेंबर रोजी विधानसभेत जिल्ह्यातील आरोग्य सेवेशी संबंधित प्रश्न उपस्थित केले.

चंद्रपूर येथे आरोग्य सेवेचा मोठा प्रश्न आहे. काही दिवसापूर्वी मंत्री महोदयांनी जिल्ह्याला भेट देऊन रुग्णालय निर्माण कार्याची प्रशंसा केली. असे असतांना सुद्धा जिल्ह्यात आरोग्य सेवेशी संबंधित अनेक प्रश्न आहेत. अशात रुग्णालयाचे पूर्ण निर्माण कधी होणार? कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्याचे थकीत वेतन, महिलांसाठी १०० खाटांचे रुग्णालय तसेच जिल्ह्यात नियमित औषध पुरवठा होण्यासाठी काय उपाययोजना करणार? इत्यादी प्रश्न आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केले.