चंद्रपुरातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी घेतला राष्ट्रवादी काँगेसचा आढावा | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०९ डिसेंबर २०२१

चंद्रपुरातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी घेतला राष्ट्रवादी काँगेसचा आढावा | आगामी नगर पंचायत/नगर परिषद/जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चंद्रपूर जिल्हा ग्रामीण कार्यकारिणी बैठकीला जनता महाविद्यालय येथे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मा.ना.श्री.जयंत पाटील साहेब ,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकनकर , मा सुबोध मोहिते माजी केंद्रीय मंत्री, मधुकर कुकडे माजी खासदार, प्रकाश गजभिये माजी आमदार, प्रवीण कुंटे महासचिव राकॉप महाराष्ट्र, राजेन्द्र वैद्य जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.

सर्व तालुका अध्यक्ष,विधानसभा अध्यक्ष, शहर अध्यक्ष यांच्याशी आपापल्या कार्याचा,बुथ बांधणीचा आढाव्या सह पक्ष कसे बळकट होणार या विषया वर चर्चा करण्यात आली.