चंद्रपुरातील गोंडकालीन वास्तु आणि महाकाली मंदिराच्या विकासासाठी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी घेतली मंत्र्यांची भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२९ डिसेंबर २०२१

चंद्रपुरातील गोंडकालीन वास्तु आणि महाकाली मंदिराच्या विकासासाठी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी घेतली मंत्र्यांची भेट


चंद्रपुरातील गोंडकालीन वास्तु आणि महाकाली मंदिराच्या विकासासाठी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी घेतली मंत्र्यांची भेट
गोंडकालीन वैभवशाली इतिहासाची साक्ष देत असलेल्या चंद्रपुरातील वास्तु आणि महाकाली मंदिराच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री किशन_रेड्डी यांची भेट घेतली.

गोंडराज्यांच्या काळामध्ये चंद्रपूर शहराची स्थापना करण्यात आली. शहराच्या स्थापनेला पाचशे वर्षे पूर्ण झाली असून, येथे असलेल्या अनेक वास्तू जतन होणे आवश्यक आहे. तत्कालीन राजांचा राजवाडा आज जिल्हा मध्यवर्ती कारागृह म्हणून वापरण्यात येत आहे. या राजवाड्यातून कारागृह बंद करून राजवाडा मुक्त करण्यात यावा, अशी मागणी देखील हंसराज अहिर यांनी केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील माता महाकाली व अन्य मंदिरांचा विकास, राजवाडा मुक्ती, परकोट विकासासोबतच परकोटला लागून अंतरावरील घरांचे नवीन बांधकामाला अडचणी आदी विषयावर चर्चा केली व चंद्रपूरला भेट देण्याची विनंती केली.