तेली समाजाने राजकारणात सक्रिय व्हावे : गोविल मेहरकुरे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

१२ डिसेंबर २०२१

तेली समाजाने राजकारणात सक्रिय व्हावे : गोविल मेहरकुरे

तेली समाजाने राजकारणात सक्रिय व्हावे*


गोविल मेहरकुरे : यंग संताजी ब्रिगेड शाखेचे पठाणपुरा येथे उदघाटन*चंद्रपूर : लोकशाहीची यशस्वीता नागरिकांच्या सक्रियेतेवर अवलंबून असते. भारतातील तेली समाज राजकारणापेक्षा व्यापार-उदीमला महत्त्व देतो. लोकशाहीतील सजग नागरिक म्हणून तेली समाजाने धाडसाने राजकारणात सक्रिय झाले पाहिजे, असे उद्गार तालुका अध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ गोविल मेहरकुरे यांनी काढले. ते यंग संताजी ब्रिगेड शाखेचे पठाणपुरा येथे उदघाटना प्रसंगी बोलत होते.

यावेळी नगरसेवक वसंत देशमुख, माजी नगरसेवक आकाश साखरकर, समाजाचे जेष्ठ नेते रमेश भुते, समाजाचे सक्रिय नेते अजय वैरागडे, नितेश जुमडे, जितेंद्र इटनकर, शिरीष तपासे, शैलेश जुमडे, विकास घटे, रामदास बनकर, भूषण देशमुख, दर्शन झाडे, मयूर बनकर यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना तालुका अध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ गोविल मेहरकुरे म्हणाले कि, जिल्ह्यात तेली समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु समाजाला राजकारणात स्थान तेली समाजाचा संख्येप्रमाणे दिले जात नाही. हि बाब अत्यंत खेदाची असून, येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर आहे. त्यामध्ये तेली समाजाला मोठ्या प्रमाणात स्थान मिळण्याकरिता राजकीय पक्षाने तिकीट देण्यासाठी युवकांनी सक्रिय व्हावे तसेच राजकारणात यशस्वी झालेल्या बांधवानी समाजातील अन्य घटकांसाठी देखील काम करावे. असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. यावेळी अन्य मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली.