गेवरा बुज. येथे जाणीव रुग्णालय वर्षांपूर्ती निमित्त मोफत आरोग्य तपासणी Free health check up - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, डिसेंबर ३०, २०२१

गेवरा बुज. येथे जाणीव रुग्णालय वर्षांपूर्ती निमित्त मोफत आरोग्य तपासणी Free health check up

गेवरा बुज. येथे जाणीव रुग्णालय वर्षांपूर्ती निमित्त मोफत आरोग्य तपासणी
सावली/ प्रतिनिधी
      तालुक्यातील गेवरा बुज. येथील सोबत फाउंडेशन चंद्रपूर संलग्नित जाणीव रुग्णालय गेवरा बुज.दिनांक 1 जानेवारी ला 1 वर्ष पुर्ण होत असून त्यानिमित्ताने जाणीव रुग्णालय गेवरा बुज. येथे दिनांक 1 जानेवारी 2022 ला सकाळी 10 वाजता वार्षिक अंक प्रकाशन व पोस्टर प्रदर्शनीचे उदघाटन परीक्षित पाटील तहसीलदार साहेब यांचे शुभ हस्ते होणार असून त्यांनतर मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी करण्यात येणार असून अत्यल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहे, सांयकाळी सामाजिक प्रबोधनत्मक जाहिर कीर्तन मा. बावणे महाराजवडगाव, 2 जानेवारी 2022 ला महिलांची आरोग्य तपासणी, बालरोग तपासणी, व अस्थीरोग तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून करण्यात येणार, रात्रौ सामाजिक प्रबोधनपर जाणीव रुग्णालयाची टीम नाटिका सादर करणार असून 3 जानेवारी 2022 ला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व विविध स्पर्धा घेण्यात येणार आहे तरी होणाऱ्या मोफत आरोग्य तपासणीचा जनतेनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Free health check up