सर्वोच्च न्यायालयाचे आदेश : ग्रामपंचायत पोटनिवडणूक स्थगित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०७ डिसेंबर २०२१

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश : ग्रामपंचायत पोटनिवडणूक स्थगितनागपूर दि.07 :   नागपूर जिल्ह्यात एकूण 90 ठिकाणच्या ग्रामपंचायत पोटनिवडणूक होत असून त्यापैकी 5 ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्देशानुसार निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहे.


            नागपूर जिल्ह्यात 90 ग्रामपंचायतीतील 116 रिक्तपदांसाठी 21 डिसेंबर रोजी निवडणूक होत आहेत. या निवडणुकी मधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गसाठीच्या रिक्त जागांची पोट निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. न्यायालयाने दिलेल्या आपल्या आदेशामध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची निवडणूक आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देशित केले आहे.


            या आदेशानुसार नागपूर (#Election #Nagpur) जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील येनवा, नरखेड तालुक्यातील मासोरा, कळमेश्वर तालुक्यातील बोरगाव खुर्द मोहदा तालुक्‍यातील घोट मुंडर, नागपूर ग्रामीण मधील किन्हार मावजी या गावात नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी होणाऱ्या पोट निवडणुकीला स्थगित करण्यात आले आहे. यासंदर्भात आज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभारी असणाऱ्या उपजिल्हाधिकारी डॉ.शिवनंदा लंगडापुरे यांनी आदेश जारी करत सर्व संबंधितांना न्यायालयाचे निर्देश लेखी कळविण्याची कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे.#Election #Nagpur