Top News

प्रादेशिक मराठी बातमीपत्र | 5 फेब्रु, 2023 | News Services Division, All India Radio News - News On AIR

  5 फेब्रु, 2023 संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रमालाच देव मानण...

ads

रविवार, डिसेंबर ०५, २०२१

एकच मिशन जुनी पेंशन | ८ डिसेंबर ला धडकणार #उमरेड येथे संघर्ष मेळावाआशीर्वाद मंगल कार्यालय उमरेड येथे भव्य पेंशन संघर्ष मेळावा


 हिवाळी अधिवेशन कल्याण ते मुंबई पेंशनमार्चची देणार नांदी...


प्रतिनिधी :- नागपुर 

राज्य शासनाच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ पासून लागलेल्या शासकीय, निमशासकीय शिक्षक, प्राध्यापक, तलाठी, ग्रामसेवक, लिपिकवर्गीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेला कडाडून विरोध करीत सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात पुन्हा एल्गार पुकारला आहे. राज्यभरातील ६०च्या वर कर्मचारी संघटना एकत्र येत जुन्या पेंशन संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत कर्मचाऱ्यांची २२ नोव्हेंबरपासून आझाद मैदान मुंबई येथून निघालेली पेन्शन संघर्ष यात्रा कर्मचार्यांच्या न्याय जुनी पेंशन चा जागर करत ०८ डिसेंबर २०२१ ला उमरेड येथे पोहचत असून भव्य असा पेंशन संघर्ष मेळावा उमरेड येथील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे सकाळी ९.०० वाजेपासून होणार असून दुपारी १.०० वाजता समारोप सेवाग्राम जि वर्धा येथे होणार आहे.


जुनी  पेन्शन योजनेच्या मागणीसाठी  महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातून जवळपास 60 च्या वर विविध संघटनांनी एकत्रित येत जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती तयार केली.संघर्ष समितीने शासनाविरुद्ध पुकारलेल्या त्रिस्तरीय आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात आझाद मैदान मुंबई ते सेवाग्राम वर्धा पेन्शन संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक जिल्हात जावून पेंशनचा जागर या यात्रे द्वारा करण्यात आला. 


जुनी पेन्शन हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा संवैधानिक अधिकार असून शेअर बाजार आधारीत NPS/DCPS  पेन्शन योजनेच्या ताब्यात कर्मचाऱ्यांचे भविष्य देण्यास राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. सर्व संवर्गाच्या सरकारी अधिकारी, कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना संघर्ष  यात्रेत सहभागी असून राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी. 1 नोव्हेंबर 2005 पासून सरकारने कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करून त्यांचे भविष्य अंधकारमय केले आहे.अनेक कर्मचारी राज्यांमध्ये दरम्यानच्या काळात मृत झालेले आहेत त्यांची कुटुंब मरण यातना सोसत आहेत पण सरकार त्यांना कोणतीही मदत करत नाही.नोकरीची तीस वर्ष प्रामाणिक सेवा केल्यानंतर म्हातारपणी कर्मचाऱ्यांनी उदरनिर्वाहासाठी कोणापुढे हात पसरावे? कर्मचाऱ्यांचे असुरक्षित झालेले भविष्य सुरक्षित करण्यासाठी जुनी पेन्शन योजना हाच पर्याय असून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटन च्या माध्यमातून लढा पुढे आला असून आता जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचा मूलभूत अधिकार जुनी पेन्शन मिळवून ; सर्व कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन मिळवण्यासाठी  निर्णायक आंदोलनासाठी तयार रहावे असे आवाहन जिल्हा जिल्हात पेंशन संघर्ष यात्रेतील सहभागी पदाधिकार्यांद्वारा करण्यात आले. #कल्याण ते मुंबई पेंशन मार्च...


नागपुर येथे होणारे हिवाळी अधिवेशन आता मुंबई येथे होणार असल्याने या पेंशन संघर्ष यात्रेनंतर जुनी पेंशन संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून भव्य असा कल्याण ते मुंबई पेंशन मार्च होणार असून जोवर न्याय मागण्या मान्य होत नाही आणि मयत कर्मचार्यांच्या परिवाराला न्याय मिळत नाही तोवर माघार घेतली जाणार नसल्याचे जुनी पेंशन संघर्ष समन्वय समितीचे नागपुर जिल्हा संयोजक अतुल खांडेकर यांनी सांगितले. 


 

#पेंशन संघर्ष यात्रेत सहभागी संघटना

           

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी यूनियन र.नं 4340, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी व अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजीपाटील), मंत्रालयीन कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना र.नं. 615, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (संभाजी), शिक्षक भारती संघटना, महाराष्ट्र पशूचिकित्सा व्यवसायी संघटना र. नं. 1945, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर वर्ग 4 कर्मचारी संघटना,महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटना, विदर्भ पटवारी संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, भूमी अभिलेख कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जिल्हा परिषद रेखाचित्र अभियांत्रिकी कर्मचारी संघटना र. नं. 2593, पेन्शन बचाव कृती समिती, शिक्षक महासंघ, महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना, नागपुर, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, प्रहार शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी वर्ग 4 संघटना, महाराष्ट्र राज्य राष्ट्रसेवा आरोग्य सेवक कर्मचारी संघटना, भारतीय कामगार सेवा महासंघ, महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय शिक्षक संघ, म्हाडा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य, शिक्षक संघर्ष संघटना, महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य वनविभाग कर्मचारी संघटना, मुंबई शिक्षक लोकशाही आघाडी, शिक्षक सहकार संघटना, गव्हरमेंट प्रेस कर्मचारी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद, MFUCTO संघटना, महाराष्ट्र राज्य प्राध्यापक जुनी पेन्शन कृती समिती फेडरेशन, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटना, जिल्हा परिषद रेखाचित्र अभियांत्रिकी कर्मचारी संघटना र. नं. 2593, पेन्शन बचाव कृती समिती, शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ, आदिवासी कर्मचारी संघटना, विदर्भ शिक्षक संघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, AIFUCTO संघटना, नर्सेस फेडरेशन, नर्सेस युनियन, महाराष्ट्र राज्य लिपिक संवर्गीय हक्क परिषद, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य क्रिडा शिक्षक महासंघ, जिल्हा परिषद लेखाकर्मचारी अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य उर्द शिक्षक संघटना, लेखा व कोषागार अधिकारी कर्मचारी संघटना, Gov. इंजिनिअरिंग कॉलेज प्रोफेसर यूनियन , महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक 

परिषद, शिक्षक हितकारिणी संघटना, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना (लातूर)


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.