डी एड कॉलेज बाबुपेठ येथे नवीन लसीकरण केंद्र सुरू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१५ डिसेंबर २०२१

डी एड कॉलेज बाबुपेठ येथे नवीन लसीकरण केंद्र सुरू


चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे आज दिनांक 14/12/2021 ला माजी झोन सभापती व नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करून शासकीय डी एड कॉलेज बाबुपेठ येथे नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.

चंद्रपूर शहरात लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून डीएड कॉलेज परिसरातील नागरिकांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या लसीकरण केंद्राचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन नगरसेविका कल्पनाताई बगुलकर यांनी केले आहे.

:
चंद्रपूर शहरात सध्या covishield covaccine दोन्ही लसीकरण केंद्र सुरू असून, गरोदर मातांसाठी विशेष राखीव केंद्र ठेवण्यात आले आहे.