८२ शिकाऊ डॉक्टरांना कोरोना ची लागण #Covid #MH - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत३१ डिसेंबर २०२१

८२ शिकाऊ डॉक्टरांना कोरोना ची लागण #Covid #MH

 #


मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ८२ शिकाऊ डॉक्टरांना कोरोना ची लागण झाल्याच्या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे. या निष्काळजीपणाबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना दिल्या. 
राज्यातील अन्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनीही याबाबतचे नियम काटेकोरपणे पाळावेत.कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले मनुष्यबळ बाधित होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सर्व महाविद्यालयांना सतर्क करण्यात यावे याबाबतच्या सूचना वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिल्या आहेत.


कोविड, ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्याकरिता आणखी कडक निर्बंध आले असून, सामाजिक- धार्मिक कार्यक्रमांसाठी 50 लोकांनाच परवानगी आहे.