Top News

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

    चंद्रपूर (प्रतिनिधी)-     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अल्पसंख्यांक समाजातील शिख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, नवबौद्ध युव...

ads

मंगळवार, डिसेंबर १४, २०२१

नगराध्यक्ष व सहकारी यांचा नागरिकांतर्फे सत्कार


नगराध्यक्ष व सहकारी यांचा नागरिकांतर्फे सत्कार




जुन्नर /आनंद कांबळे
माणिकडोह धरणातून बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी आणल्याबद्दल नगराध्यक्ष शाम पांडे व सर्व सहकारी नगरसेवकांचा नागरिकांतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला.


आज दिनांक १४ / १२ / २०२१ रोजी जुन्नर नगरपालिकेच्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे सभागृहामध्ये जुन्नर शहरातील विविध संघटना शिवाई देवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष संजय वरुडे व सहकारी, व्यापारी असोसिएशनचे कन्हैय्या खोत व सहकारी, अमरनाथ सेवा मंडळ चे रामभाऊ मिरगुंडे व सहकारी, कलोपासक संघ चे शरद रेळेकर व सहकारी, मेडिकल असोसिएशन चे शंभूकाका गाजरे व सहकारी, शिवाई नागरी पतसंस्था चे शाम खोत व सहकारी, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान च्या राखी शहा व सहकारी, अमन फाउंडेशन चे रिजवान पटेल व सहकारी, तिळवण तेली समाज जुन्नर चे करडिले व सहकारी यांच्या वतीने जुन्नर शहराचे नगराध्यक्ष शाम सुधाकर पांडे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी सदरहू कार्यक्रमाला उपस्थित उपनगराध्यक्ष दिपेश परदेशी, अलकाताई फुलपगार, गटनेते समीर भगत, सुवर्णाताई बनकर, सना मन्सुरी, अंकिताताई गोसावी, नरेंद्र तांबोळी, प्रशासनाचे अधिकारी, सर्व पत्रकार बांधव व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी एकंदरीतच गेल्या ५ वर्षातील कामांचा बोलबाला यावेळी केला. गेल्या ५ वर्षापूर्वीची परिस्थिती व आत्ताची असलेली परिस्थिती यावर नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी बोलताना जिजामाता महिला संघटनेच्या राखी शहा यांनी असे सांगितले कि असे नगराध्यक्ष आम्हाला पुन्हा लाभावे जेणेकरून जुन्नर शहरातील असलेला आमच्या सर्व माता भगिनींचा पाण्याचा प्रश्न यांनी कायमस्वरूपी सोडवलेला आहे.

त्याचबरोबर कलोपासक संघटनेचे शरद रेळेकर यांनी तरुणाईला दिलेली संधी हि तरुणांनी योग्य पद्धतीने कामकाज करत प्रशासनावर योग्य पद्धतीने पकड ठेवून सदरहू योजना मंजूर करून आणली हि गोष्ट शहरवासीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. प्राध्यापक सुरेश भोसले सर यांनी जुन्नर शहरातील स्वच्छता व स्वच्छतेच्या प्रती देशपातळीवर मिळालेले पुरस्कार, शहरातील होत असलेली विविध विकासकामे याबद्दल सर्व शहरवासीयांच्या वतीने कौतुक केले. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष यांनी कोविड च्या काळात नगरपालिकेने ज्यापद्धतीने परिस्थिती हाताळली व व्यापार्यांना, शहरवासीयांना समाधानकारक पद्धतीने शहराचा कारभार व्यवस्थित रित्या संपन्न केल्याबद्दल संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष व नगरपालिका प्रशासनाचे कौतुक केले. तसेच उपनगराध्यक्ष दिपेश परदेशी, अलकाताई फुलपगार, व समीर भगत यांनी असे सांगितले कि हि योजना आमच्या सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने पार पडली असून सदरहू योजनेला नगरपालिका प्रशासन, प्रशासनातील अधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी यांचे सर्व शहरवासीयांनी आभार मानले आहेत त्याबद्दल आम्ही शहरवासियांचे सदैव ऋणी राहू. व नगराध्यक्ष शाम पांडे यांच्या नेतृत्वाखाली सदरहू योजना मार्गी लावत असताना प्रशासनातील सर्व अडचणी दूर करून त्यांनी त्यांच्या प्रयत्नांनी व आम्ही त्यांना मोलाची साथ देऊन सदरहू योजना मार्गी लावण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष शाम पांडे असे म्हणाले कि, जुन्नर शहरवासीयांनी केलेला माझा हा सन्मान माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण असून याबाबतीमध्ये मी शहरवासीयांचा आयुष्यभर ऋणी राहील. व हि योजना पार पाडण्यामध्ये ज्या ज्या मंडळींनी सहकार्य केले आहे त्या सर्व मंडळींचे नगराध्यक्ष यांनी आभार मानले. व शहराच्या कामकाजाबद्दल समाधानकारक पद्धतीने इथून पुढेही अशीच समाधानकारक कामे होत राहतील असा मानस नगराध्यक्ष शाम पांडे यांनी व्यक्त केला. एकंदरीतच हि योजना शहरवासीयांच्या पुढील १०० वर्षाचा कायमस्वरूपी प्रश्न सुटल्याबद्दल नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले व नगराध्यक्ष यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना व सर्व सहकारी नगरसेवकांना भरभरून शुभेच्छा दिल्या.

Citizens felicitate the Mayor and his colleagues


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.