थंडी वाढल्याने फूटपाथवर राहणाऱ्या बारा बेघर लाभार्थ्यांना महानगरपालिकेच्या निवारागृहात सहारा #Chandrapur - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०७ डिसेंबर २०२१

थंडी वाढल्याने फूटपाथवर राहणाऱ्या बारा बेघर लाभार्थ्यांना महानगरपालिकेच्या निवारागृहात सहारा #Chandrapurसध्या हिवाळ्यामुळे थंडी वाढली असून, उघड्यावर राहणाऱ्या भिकारी बांधवांची गैरसोय होत असते. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत आज ७ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी भिकारी बांधवांना मनपाच्या बेघर निवारागृहात आणण्यातआले .  

महाकाली मंदिर, शनी मंदिर,मज्जिद ग्राउंड दर्गा, व फूटपाथ वरील बेघर लाभार्थ्यांना नगिनाबग येथील सरदार पटेल शाळेतील बेघर निवाऱ्यामध्ये आणण्यात आले.  पूर्वी वास्तव्यास असलेले 6 व आज ७ डिसेंबर रोजी रात्री 6 असे एकुण 12 बेघर लाभार्थी सध्या निवाऱ्यमध्ये वास्तव्यास आहे.