पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे अनावरण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२६ डिसेंबर २०२१

पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे अनावरणचंद्रपूर : तेली समाजाचे आराध्य दैवत श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज भव्य रथयात्रा व दर्शन सोहळा निमित्य नितेश जुमडे यांचे प्रतिष्ठाण संताजी ट्रेडर्स व भाई भाई बिल्डिंग सोल्युशन दिनदर्शिका २०२२ अनावरण जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेटीवर यांच्या हस्ते झाले. हा सोहळा स्थानिक जटपुरा गेट येथील पंचतली हनुमान मंदिर येथे संपन्न झाला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार देवराव भांडेकर, ऍड. दत्ता हजारे, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे, सूर्यकांत खनके, अजय वैरागडे, माजी महापौर संगीता अमृतकर, माजी नगरसेवक आकाश साखरकर, तालुका अध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ गोविल मेहरकुरे, नितेश जुमडे, रवींद्र जुमडे, निलेश बेलखडे, शैलेश जुमडे  यांची उपस्थिती होती. 

                    याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत प्रकाशीत केलेली दिनदर्शिका दर्जेदार असुन यामध्ये विविध दिनविशेष दिलेले असल्यामुळे विद्यार्थी तसेच सर्वसामान्य ग्राहकांच्या ज्ञानात भर पडणार असल्याचे सांगितले.


#chandrapur #vijaywadettiwar