चंद्रपुरातील नाट्यकर्मी सविता देशपांडे यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत३० डिसेंबर २०२१

चंद्रपुरातील नाट्यकर्मी सविता देशपांडे यांचे निधन
दैनिक "हितवाद" या दैनिकाचे माजी जिल्हा प्रतिनिधी व नाट्यदिग्दर्शक श्री सुनील देशपांडे यांच्या पत्नी सौ. सविता देशपांडे यांचे आज रात्री 8.15 ला नागपूर येथे निधन झाले। मृत्यूसमयी त्यांचे वय 57 वर्षांचे होते। त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, जावई, स्नुषा, नात आणि मोठा आप्तपरिवार आहे।
          त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 31/12/2021 ला त्यांचे  201, घनश्याम लक्ष्मी अपार्टमेंट, मनीषनगर रोड, सोमलवाडा, नागपूर या निवासस्थानाहून निघेल।
      
 
सविताताई देशपांडे यांचा गृहिणी ते रंगकर्मी हा प्रवास महत्वपूर्ण : आ. सुधीर मुनगंटीवार

सौ. सविताताई देशपांडे यांच्या निधनाने ज्येष्ठ पत्रकार सुनील देशपांडे यांच्यासह संपूर्ण देशपांडे परिवाराला झालेल्या दुःखाची अनुभूती मला आहे. सुनील देशपांडे यांच्या सोबतीने सविताताईनी नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे . अनेक हौशी नाटकांच्या निर्मिती प्रक्रियेत सविताताईंचा सहभाग राहिला आहे. सुनील देशपांडे यांच्या पत्रकारितेच्या प्रवासात सुद्धा सविताताईनी त्यांना मोलाची साथ दिली आहे.गृहिणी ते रंगकर्मी असा त्यांचा प्रवास महत्वाचा आहे.परमेश्वर सौ सविताताईंच्या पुण्यात्म्याला शांती प्रदान करो व या दुःखातून सावरण्याचे बळ शोकाकुल देशपांडे परिवाराला देवो, अशी शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.