Top News

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

    चंद्रपूर (प्रतिनिधी)-     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अल्पसंख्यांक समाजातील शिख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, नवबौद्ध युव...

ads

शुक्रवार, डिसेंबर ०३, २०२१

मुंबईत ठरले काँग्रेसचे उमेदवार; चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणूक #Chandrapur #Election #mumbai #congress

 नगरपंचायत व नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवाराच्या तिकीट वाटप संदर्भात बैठक पार पडली 

चंद्रपूर जिल्ह्यातील 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपंचायत व नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवाराच्या तिकीट वाटप संदर्भात मुंबई पक्ष कार्यालयात राज्य निवड मंडळाची बैठक पार पडली. जिल्ह्यातील सावली, पोंभूर्णा, गोंडपिंपरी, कोरपना व जिवती नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी टिळक भवन मुंबई येथे संपन्न झाली.यामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसंदर्भात संपूर्ण उमेदवाराबद्दल आढावा व माहिती देण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा  आमदार नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांची उपस्थिती होती. 

शनिवार, दि. 4 डिसेंबर 2021 रोजी पलिकमंत्री  वडेट्टीवर सकाळी 11 वाजता सावली येथे नगरपंचायत निवडणूक संदर्भाने पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा. दुपारी 1.30 वाजता सिंदेवाही येथे आगमन व नगरपंचायत निवडणूक संदर्भाने पदाधिकारी यांच्यासमवेत चर्चा करणार आहेत 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.