बॉलिवूड स्टार व्याघ्र दर्शनासाठी चंद्रपुरातील ताडोबात दाखल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२९ डिसेंबर २०२१

बॉलिवूड स्टार व्याघ्र दर्शनासाठी चंद्रपुरातील ताडोबात दाखलअभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया डिसूझा कुटुंबासोबत

अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया डिसूझा कुटुंबासोबत व्याघ्र दर्शनासाठी काल मंगळवारी चंद्रपुरातील ताडोबात दाखल झाले. यावेळी आज सकाळी त्यांनी ताडोबा (कोअर) खुटवंडा गेटवरुन सफारी केली.

ताडोबात या आणि हमखास वाघ पहा असे ब्रीदवाक्य ताडोबाचे आहे. अशातच येथे वाघाला पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक,मंत्री, सेलिब्रिटी येत असतात.


अशातच अभिनेता रितेश विलासराव देशमुख व त्यांची पत्नी जेनेलिया डिसूझा व मुलगा रियान आणि राहिल त्याच सोबत दोन मित्रासह जगप्रसिद्ध ताडोबा मध्ये व्याघ्र दर्शन करण्या करिता दिनांक 28 दिसंबर 2021 रोज सायंकाळी लिम्बन रिसोर्ट, मुधोली येथे त्यांचे आगमन झाले असून आज 29 दिसंबर रोज ताडोबा (कोअर) खुटवंडा गेटवरुन सकाळ फेरी करिता गेले असता त्यांना वाघाचे दर्शन सोडून इतर प्रण्याचे दर्शन झाले. दोन दिवसाच्या मुकामी असल्यामुळे बाकी असलेल्या सफारी मध्ये व्याघ्र दर्शन होण्याचे शक्यता आहे.


Bollywood star arrives at Tadoba in Chandrapur for tiger sighting