Top News

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

    चंद्रपूर (प्रतिनिधी)-     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अल्पसंख्यांक समाजातील शिख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, नवबौद्ध युव...

ads

रविवार, डिसेंबर ०५, २०२१

बामणी येथे रक्तदान शिबीर व सत्कार सोहळा |


 Blood donation camp and felicitation ceremony at Bamani

आज दि.05/12/2021 रोजी सांस्क्रुतिक भवन बामणी येथे सरल फाउंडेशन, विर भगतसिंग वाचनालय तसेच जय हनुमान व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले.

        या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन लाभलेले सुभाष ताजने सरपंच ग्रा. प. बामणी, प्रमुख अतिथी ॲड. हरिष गेडाम जि. प. सदस्य, चंदु घाटे ग्रा. पं. सदस्य, सत्कारमूर्ती राज्यस्तरीय महशिक्षक पुरस्काराने सन्मानित भगवान बुरांडे सर, व CRPF मध्ये नियुक्त झालेले विशाल बल्लावर, तसेच मंचावर सरल फाउंडेशनचे उपाध्यक्ष राजेश बट्टे, विर भगतसिंग वाचनालय चे अध्यक्ष सहदेव देरकर, जय हनुमान व्यायामशाळा चे अध्यक्ष राजेश टोंगे, छत्रपती संभाजी राजे अँकेडमी चे प्रशिक्षक मिलींद प्रजापती, जगुया थोडंसं माणुसकी साठी चे कार्तिक बल्लावार, जिल्हा रक्तपेढी चे पथक प्रमुख पवार सर उपस्थित होते.

          सत्कारमूर्ती भगवान बुरांडे सर व  विशाल बल्लावार यांचे सुभाष ताजने, हरिष गेडाम, चंदु घाटे यांनी शाल, श्रीफळ, शिल्ड व रोपटं देऊन सत्कार करण्यात आले.

        त्यानंतर 39 तरुणांनी रक्तदान केले. संचालन सचिन बरडे, प्रास्ताविक गणेश गेडाम व आभार प्रदर्शन राजेश बट्टे यांनी केले.

 या कार्यक्रमाच्या  रवि साळवे सर, विश्वास बल्लावार, शरद सोयाम, राकेश राऊत, भाविक टेकाम, सुनिल चापले, ज्ञानेश देरकर, वैभव साळवे, आशिष बट्टे, रोशन कांबळे, संतोष बट्टे, कार्तिक जिवतोडे, अमोल राजूरकर, निश्चल इटनकर, निरोज प्रसाद, राजु मेश्राम यांनी सहकार्य केले.


Blood donation camp and felicitation ceremony at Bamani


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.