धाबेपवनी येथे पोलीस दलाच्या वतीने महापरिनिर्वाण दिन.निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०७ डिसेंबर २०२१

धाबेपवनी येथे पोलीस दलाच्या वतीने महापरिनिर्वाण दिन.निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.


संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.७ डिसेंबर:-
गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर गोंदिया कॅम्प देवरी, उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर देवरी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन हेगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची जनजागृती करण्यासाठी दि.६ डिसेंबरला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून, सशस्त्र दूरक्षेत्र धाबे पवनी येथे माधवराव पाटील डोंगरवार विद्यालयात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन हेगडकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला पाहुणे म्हणून क्रांतिकारी संघटना नवेगावबांधच्या बनसोड,पवनी धाबे ग्रामपंचायतचे सरपंच पपीता नंदेश्वर, उपसरपंच पराग कापगते,श्रीनारायण डोंगरवार ,मुख्याध्यापक कैलास खुणे, रेखा शहारे, सुनंदा येल्ले, ग्रामसेवक कोल्हटकर, सचिन वाढवे, आनंद डोंगरवार उपस्थित होते.
प्रारंभी विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून, सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.यावेळी भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन अतिथींचा सत्कार करण्यात आला.
वेगवेगळ्या विभागात आपल्या प्रावीण्यासह भरती होऊन, देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन यावेळी अतिथींनी आपल्या भाषणातून केले. सशस्त्र दूरक्षेत्र धाबेपवनी या नक्षलग्रस्त भागातील युवकांना पोलीस भरती व स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होण्याबाबत मार्गदर्शन करून, त्यांचे मनोबल वाढविण्यात आले. सशस्त्र दुरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी अझरुद्दीन शेख, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पानसरे ,सशस्त्र पोलीस शिपाई अविनाश खटके यांनी
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक हर्षा हटवार, द्वितीय क्रमांक सिमरन कुंभरे व तृतीय क्रमांक राणी काटेंगे  यांना अनुक्रमे १००० रुपये, ७५०, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्याला ५०० रुपये रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र तसेच ४६ सहभागी विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उपस्थित प्रतिष्ठित नागरिकांना भारतीय संविधान वाटप करण्यात आले. सस्त्र दुरक्षेत्र धाबेपवनी  येथील नक्षलग्रस्त भागातून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगून, त्यांना नक्षल चळवळीपासून दूर राहण्याबाबत यावेळी आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाला प्रभारी अधिकारी अझरुद्दीन शेख, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पानसरे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे संचालन सशस्त्र पोलीस शिपाई मनीष बोरकर व सूर्यकांत दुधे यांनी केले.प्रभारी अधिकारी अझरुद्दीन शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.जिल्हा पोलीस दलाचे,ई कंपनी प्लाटून क्रमांक ०२,राखीव पोलीस बल गट क्रमांक १५ गोंदिया व विशेष कृती दल नागपूर कॅम्प देवरी चे सर्व  पोलीस अंमलदार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले.