०३ डिसेंबर २०२१
Home
Unlabelled
सराफा व्यवसायी जनार्दन पोवळे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन.
सराफा व्यवसायी जनार्दन पोवळे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन.
सकाळी १०.०० वाजता अंत्यसंस्कार.
नवेगावबांध दि.३ डिसेंबर:-
येथील सराफा व्यवसायिक जनार्दन रामचंद्र पोवाळे वय वर्ष ६१ यांचे आज(दि.३) दुपारी ३.३० वाजे दरम्यान दुकानातच हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, नातवंड व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या मनमिळावू व मृदू स्वभावामुळे त्यांच्या आकस्मिक निधनानेे नवेगावबांध व परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या (४डिसेंबर शनिवारी) सकाळी १०.०० वाजता स्थानीक मोक्षधामावर अंंतिम संस्कार करण्यात येईल.
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
