आमदार किशोर जोरगेवार यांनी अभ्यासिकेसाठी केली ६० लाखांचा निधीची घोषणा; लक्ष्मीनगरात धनोजे कुणबी समाजपरिचय मेळावा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२६ डिसेंबर २०२१

आमदार किशोर जोरगेवार यांनी अभ्यासिकेसाठी केली ६० लाखांचा निधीची घोषणा; लक्ष्मीनगरात धनोजे कुणबी समाजपरिचय मेळावाचंद्रपूर : विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे, यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्या अभ्यासिकेसाठी ६० लाखांचा निधी देउ, यातून समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका उभारण्यात यावी, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. 


लक्ष्मीनगरात धनोजे धनोजे कुणबी समाज मंडळातर्फे २६ डिसेंबर रोजी आयोजित राज्यस्तरीय धनोजे कुणबी उपवर-वधू ऑनलाइन परिचय मेळाव्यात  ते बोलत होते. 

अध्यक्षस्‍थानी समाजाचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम सातपुते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्‍हा बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर, मनपाचे विरोधी पक्षनेते डॉ. सुरेश महाकुलकर उपस्‍थित होते.

यावेळी मेळाव्‍याच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य करणारे प्रा. विजय मुसळे, शुभम डाखरे व सूरज डाखरे यांचा मान्‍यवरांच्या हस्‍ते सत्‍कार करण्यात आला. संचालन प्रा. नामदेव मोरे यांनी, तर आभार विनायक धोटे यांनी मानले. या सत्रानंतर उपवर-वधूंचा परिचय मेळावा पार पडला. यात मोठ्या संख्येने उपवर-वधू सहभागी झाले होते.