माहूरकुडा,इटखेडा, महागाव जिल्हा परिषद व बाराभाटी पंचायत समिती सर्वसाधारण महिलांसाठी राखीव. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२३ डिसेंबर २०२१

माहूरकुडा,इटखेडा, महागाव जिल्हा परिषद व बाराभाटी पंचायत समिती सर्वसाधारण महिलांसाठी राखीव.

अर्जुनीमोरगाव तालुक्यातील माहूरकुडा,इटखेडा, महागाव जिल्हा परिषद व बाराभाटी पंचायत समिती सर्वसाधारण महिलांसाठी राखीव.

बोंडगावदेवी, केशोरी जिप व नवेगावबांध पंस सर्वसाधारण.

संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.23डिसेंबर:-
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रासाठी असलेले ओबीसी आरक्षण स्थगित केले होते. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पूर्वी नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसीसाठी  आरक्षित जागांवरील निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यात तालुक्यातील पाच जिल्हा परिषद क्षेत्र व दोन पंचायत समिती क्षेत्राचा समावेश होता. नंतर निवडणूक आयोगाने ओबीसीसाठी राखीव असलेले सर्व क्षेत्र सर्वसाधारण केले व या सर्व जागांवर निवडणुकां साठी नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर करून 18 जानेवारीला मतदान घेण्याचे ठरविले होते.आज दिनांक 23 डिसेंबरला सर्वसाधारण जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात बोंडगावदेवी व केशोरी जिल्हा परिषद क्षेत्र सर्वसाधारण तर माहूरकुडा, इटखेडा व महागाव हे जिल्हा परिषद क्षेत्र सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात आले आहेत. तर पंचायत समिती नवेगाव बांध सर्वसाधारण व बाराभाटी पंचायत समिती क्षेत्र महिलाकरिता राखीव झाले आहे. आता या पाच जिल्हा परिषद क्षेत्र व दोन पंचायत समिती क्षेत्रासाठी 18 जानेवारी 2022 ला मतदान होणार आहे.29 डिसेंबर पासून संकेतस्थळावर इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन पत्र 3 जानेवारी दुपारी 3.00 वाजेपर्यंत भरता येतील.नामनिर्देशन पत्रांची छाननी व त्यावर निर्णय देणे 4 जानेवारी. वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध 4 जानेवारी, नामनिर्देशन पत्राचा स्वीकार करणे अथवा नामंजूर करणे व यावरचे अपील जिल्हा न्यायालयात सादर करणे शुक्रवार 7 जानेवारी, अपिला नंतर वैद्य उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे 10 जानेवारी, उमेदवारी अर्ज मागे घेणे अपील सोडून 10 जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत,नंतर अपील आहे तिथे 12 जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व निशाणी वाटप 10 जानेवारी दुपारी साडेतीन वाजे नंतर , या सर्व जागांवर मतदान  18 जानेवारी ला होईल. मतमोजणी (21 डिसेंबरला मतदान झालेल्या जागांसह) 19 जानेवारी सकाळी दहा वाजेपासून होणार आहे. 24 जानेवारीला निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करण्यात  येतील.