सिमेंट काँक्रीट रस्त्याचे नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांच्या हस्ते झाले भूमिपूजन* - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

१६ डिसेंबर २०२१

सिमेंट काँक्रीट रस्त्याचे नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांच्या हस्ते झाले भूमिपूजन*
श्री संदीप गुरनुले ते श्री पठाण ते काशीराम मोहतुरे पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

चंद्रपूर, ता. 15 : श्री संदीप गुरनुले ते श्री पठाण ते काशीराम मोहतुरे पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांच्या हस्ते बुधवार दिनांक 12 डिसेंबर रोजी पार पडले. 

चंद्रपूर शहर महानगरपालिका,  चंद्रपूरशहर च्या जनरल फंडातून 13 लाख 85 हजार किमतीचे श्री संदीप गुरनुले ते श्री पठाण ते काशीराम मोहतुरे पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या बांधकामाचे भूमिपूजन बुधवारी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांच्या हस्ते पार पडले.  या शुभप्रसंगी श्री काशीराम मोहतुरे, श्री कैलास झाडे, श्री राजू बिरिया, श्री खेडेकरजी, श्री जागो परचाके, श्री पठाण साहेब, श्री मधुकरजी शिरसागर, श्री अनिल दाते ,श्री युवराज झाडे, विशाल बनारसे, श्रीकृष्ण सुरपाम आदींची उपस्थिती होती.