जन्मकुंडली पाहुन उपचार करणारे आगळेवेगळे हॉस्पिटल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

१० डिसेंबर २०२१

जन्मकुंडली पाहुन उपचार करणारे आगळेवेगळे हॉस्पिटल

 जन्मकुंडली पाहुन उपचार करणारे आगळेवेगळे हॉस्पिटल 

ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही हा वादाचा विषय आहे.काही लोक अगदी परदेशातील सुध्दा ज्योतिष माननारे आहेत तर काहीना हे थोतांड वाटते. 

 ज्योतिष पद्धती ही हिंदूचे प्राचीन काळापासून माननारे व ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीवर बेतलेले शास्त्र आहे. ज्योतिष या शब्दाचा उगम संस्कृत शब्द "ज्योति" मध्ये आहे. ज्योति म्हणजे प्रकाश देणारी वस्तू.

जन्मकुंडली पाहुन उपचार करणारे आगळेवेगळे हॉस्पिटल
प्राचिन काळात ब्रह्मा, आचार्य, वशिष्ठ, अंगिरा, व्यास, नारद, शौनक, भृगु, च्यवन, यवन, गर्ग,अत्रि, मनु, पौलस्य, रोमक, मरीचि, कश्यप आणि पाराशर या क्रूषिनी हे शास्त्र विकसित केले. विविध ग्रथं लिहिले.शके ८७५ मध्ये आर्यभट यांनी ‘सिध्दान्त शिरोमणी’ हा ग्रंथ लिहीला. शके ११२४ मध्ये भास्कराचार्य यांनी ‘लिलावती’ नावाचा ग्रंथ लिहीला. ज्योतिष शास्त्रामध्ये माणसाच्या जन्मवेळेची आकाशातील ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात, असे मानणारे हे शास्त्र आहे.या स्थितिचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे "ज्योतिष" शास्त्र होय.ग्रहांची स्थिती संवत्सर, अयन, मास, व कालनिर्णय, नक्षत्र मालेतील ग्रहांची भ्रमणे,होणारी ग्रहणे,यांचा सखोल अभ्यास करून अनुमाने काढली जातात.

सध्याच्या काळात भारतातील बिहार मध्ये "दरभंगा" येथे "राजकीय कामेश्वर सिंह आयुर्वेद चिकित्सालय"हे  सरकारी हॉस्पिटल असुन येथे  एक्सरे,पॅथॉलॉजी रिपोर्ट न पाहता त्या व्यक्तीच्या कुंडली, हस्तरेषा पाहुन  आयुर्वेद, योग और प्राकृतिक चिकित्सा अनुसरून उपचार केले जातात.सरकारी आयुर्वेदिक कॉलेज दरभंगा देशातील पहिले हॉस्पिटल आहे ज्याने आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक उपचारासह ज्योतिष उपचारांची सुरूवात केली आहे.उपचार म्हणजे,त्या  व्यक्तीला त्याच्यावर परिणाम करणारे ग्रहाचे रत्न धारण करण्यास सांगितले जाते किंवा मंत्र जपासह उपासना करण्यास सांगितली जाते. आवश्यक वाटल्यास आयुर्वेदिक आौषधे दिली जातात.मानवी वर्तन ‘दिनचर्या’, ‘ऋतुचार्या’व ‘पंचकर्म’यावर  ज्योतिष आधारित उपचार असल्याने आयुर्वेदिक मानते.या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर त्या व्यक्तीकडे जन्मकुंडली नसल्यास जन्मतारीख, व इतर माहिती घेऊन ज्योतिष शास्त्रात पारंगत असणाऱ्या तज्ञांकडून जन्मकुंडली काढली जाते.नंतर त्यात असणाऱ्या दोष गुण पाहुन उपचार केला जातो. 

ज्यांचा ज्योतिष या शास्त्रावर विश्वास आहे असे अनेक देशातुन-परदेशातुन येथे उपचारासाठी येत आहेत.