नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा उत्कृष्ट माॅडेल ठरावे. -सरपंच अनिरुद्ध शहारे. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०२ डिसेंबर २०२१

नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा उत्कृष्ट माॅडेल ठरावे. -सरपंच अनिरुद्ध शहारे.

शिबिरात ९७८ रुग्णांची तपासणी.


संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.२ डिसेंबर:-
नवेगावबांधचे ग्रामीण रुग्णालय रुग्णसेवेसाठी आदर्श ग्रामीण रुग्णालय ठरावे.ग्रामीण,आदिवासी क्षेत्रातील रुग्णांनाच्या आरोग्याची काळजी हे रुग्णालय वाहते.म्हणून नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा उत्कृष्ट माॅडेल ठरावे. अशी सदिच्छा अध्यक्षीय भाषणातून सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी व्यक्त केली आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे घेण्यात आलेल्या ४ दिवसीय  शिबिर संपन्न झाले.यावेळी ते बोलत होते. या शिबिरात परिसरातील ९७८ रुग्णांनी लाभ घेतला.सदर आरोग्य शिबिराचे उद्घाटन नवेगावबांधचे सरपंच अनिरुद्ध शहारे यांच्या हस्ते गोंदिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच रघुनाथ लांजेवार ,रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सतीश कोसरकर, विलास कापगते ,बाबुलाल नेवारे,नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र टंडन ,डॉ. रुपेश कापगते ,डॉ. कुकडे ,डॉ. भांडारकर, रंगारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालयांमध्ये दिव्यांग तपासणी करून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात  यावे. अशी मागणी याप्रसंगी रुग्ण कल्याण समिती सदस्य सतीश कोसरकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली .ग्रामीण जनतेच्या आरोग्यासाठीच ग्रामीण क्षेत्रामध्ये शिबिर आयोजित करण्याचा आरोग्य विभागाचा मुख्य हेतू असल्याचे मत या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी व्यक्त केले .सदर शिबिरामध्ये शरीरावरील गाठींचे १२ ऑपरेशन, हर्नियाचे ७ ऑपरेशन, हायड्रोसिल चे १८,दंत रोगाचे २०१ रुग्णांवर उपचार करण्यात आला, त्याचप्रमाणे ५३ रुग्णाची सोनोग्राफी करण्यात आली . सदर कॅम्पमध्ये एकंदर ९७८ रुग्णांनी आपले आरोग्य तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला .
शिबीराचे उद्घाटन प्रसंगी संचालन एस. एच. रेवतकर यांनी ,प्रास्ताविक डाॅ. सुरेंद्र टंडन यांनी तर आभार डाॅ. महेश लोथे यांनी मानले . सदर शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ. भांडारकर, सर्जन डॉ. सचिन रहांगडाले ,हृदय रोग तज्ञ डॉ. खुणे , सोनोग्राफी डॉ. घोडेश्वार ,स्त्री रोग तज्ञ डॉ. बडवाईक, भूल तज्ञ डॉ. गायधने, बालरोगतज्ञ माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते ,डाॅ शाम भोयर यांनी सेवा दिली.तर ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.