भाजपा औद्योगिक आघाडीतर्फे मोफत ई श्रम कार्ड शिबिर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२६ डिसेंबर २०२१

भाजपा औद्योगिक आघाडीतर्फे मोफत ई श्रम कार्ड शिबिर

पूर्व पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेव स्व. अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जयंती निमित्त 'सुशासन दिवस' म्हणून साजरा करण्यात आला व  भाजपा औद्योगिक आघाडी चंद्रपूर तालुका तर्फे मोफत ई श्रम कार्ड शिबिर आज दिनांक 26 दिसम्बर 2021 रोजी  संजय यादव यांच्या कृषी दुकान, दुर्गापुर येथे घेण्यात आले. दुर्गापुर परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा भरपूर लाभ घेतला.यावेळेस भाजपा चंद्रपूर तालुका प्रभारी रामपाल सिंह,  जि. प. बालकल्याण सभापती रोशनी खान, भारत रायपुरे,  पंचायत समिती सदस्य संजय यादव, भाजपा तालुका अध्यक्ष हनुमान काकडे,  माजी पंचायत समिती सदस्य विशाल टेंभुर्णे, ग्रामपंचायत सदस्य दुर्गापूर सुनील भर्वेकर, फारुख शेख, माजी ग्रामपंचायत सदस्य, ऊर्जानगर संजय मिलमिले तसेच भाजपा औद्योगिक आघाडीची चंद्रपूर तालुक्याचे अध्यक्ष श्रीकांत राजेंद्र देशमुख, अभय रॉय, राहुल स्वामी आदि उपस्थित होते.

 #Bjp #Chandrapur