खासदार बाळू धानोरकरांनी केली धडाकेबाज फलंदाजी - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, डिसेंबर २६, २०२१

खासदार बाळू धानोरकरांनी केली धडाकेबाज फलंदाजी

 दुर्गापूर येथे न्यू सिद्धार्थ क्रिकेट क्लबतर्फे खासदार चषक; चंद्रपूर जिल्हा इंटक युवक काँग्रेसच्या माध्यमातून दुर्गापूर येथील न्यू सिद्धार्थ क्रिकेट क्लब तर्फे खासदार चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. आज २६ डिसेंबर रोजी धडाकेबाज फलंदाजी करीत खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते या चषकाचे उदघाटन करण्यात आले. 

यावेळी काँग्रेस जेष्ठ नेते विनोद दत्तात्रय, जिल्हाध्यक्ष इंटक युवक काँग्रेस प्रशांत भरती,  न्यू सिद्धार्थ क्रिकेट क्लब अध्यक्ष मेहबूब शेख, ,सरपंच ऊर्जानगर मंजुषाताई येरगुडे, दुर्गापूर ग्रामपंचायत सरपंच पूजा मानकर, ग्रामपंचायत सदस्य ऊर्जानगर सारिका कावळे, ग्रामपंचायत सदस्य ऊर्जानगर सागर तुरक, अलोक चौरे, साहिल शेख, अश्रफ खान, रवी दुर्गे, गाजू गोंडे यांची उपस्थिती होती.  

 यावेळी पहिल्या बॉलमध्ये षटकार मारत येथे आलेल्या क्रीडा प्रेमींचे मन जिकंले. यावेळी मोठ्या संख्येत खेळाडू आले होते. हे चषक पुढील पंधरा दिवस सुरु असणार आहे. त्यामुळे येथील क्रीडा प्रेमींना हे खासदार चषक पर्वणी ठरणार आहे. याप्रसंगी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.


जिल्ह्यात सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात युवकांना मोठ्या प्रमाणात व्यासपीठ मिळण्याकरिता खासदार बाळू धानोरकर नेहमी आग्रही असतात. त्यासोबतच युवकांना मोठ्या स्तरावर खेळण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. युवकांनी खेळभावनेने स्पर्धेत सहभागी होऊन चंद्रपूरचे नावलौकिक वाढवा असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. 

#baludhanorkar