#आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेचे अनुदान थकीत - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, डिसेंबर २३, २०२१

#आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेचे अनुदान थकीत

आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेचे अनुदान थकीत


आनंदवन (ता. वरोरा, जि. चंद्रपूर) येथील महारोगी सेवा समिती या संस्थेच्या थकीत अनुदानाबाबत आमदार कपिल पाटील यांचा तारांकित प्रश्न आणि त्यावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी लेखी उत्तर दिले.


महाराष्ट्र विधानपरिषद तारांकित प्रश्नोत्तरांत गुरुवार, दिनांक २३ डिसेंबर, २०२१ रोजी आनंदवन ( ता . वरोरा , जि . चंद्रपूर ) येथील महारोगी सेवा समिती या संस्थेच्या थकीत अनुदानाबाबत आमदार कपिल पाटील यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्याकडे प्रश्न उपस्थित केला. 


आमदार कपिल पाटील : आनंदवन ( ता . वरोरा , जि.चंद्रपूर ) येथील डॉ . बाबा आमटे संस्थापित महारोगी सेवा समिती या संस्थेला निवासी कुष्ठरुग्णांसाठी रुग्णालय उपचार ( PHD ) तत्वांतर्गत प्रतिरूग्ण प्रतिमाह रूपये २२०० / - आणि पुनर्वसन ( LCS ) तत्वांतर्गत प्रतिरुग्ण प्रतिमाह रूपये २००० / - एवढे अनुदान भरती असलेल्या कुष्ठरुग्णांच्या संख्येनुसार दिले जाते , हे खरे आहे काय , 

श्री . राजेश टोपे : होय , हे खरे आहे 


आमदार कपिल पाटील :  असल्यास , सदर अनुदान संस्थेने खर्च केल्यानंतर परिरक्षणार्थ खर्चाच्या ८० टक्के या प्रमाणात परतफेड स्वरुपात संस्थेला दिले जाते , हे ही खरे आहे काय ,

श्री . राजेश टोपे :  होय , हे खरे आहे 


 आमदार कपिल पाटील :   असल्यास , महारोगी सेवा समितीचे सुमारे रुपये साडे पाच कोटी अनुदान थकीत असल्यामुळे संस्थेला कुष्ठरुग्णांचे उपचार व पुनर्वसन करणे अवघड जात आहे , हे ही खरे आहे काय ,


श्री . राजेश टोपे :   अंशत : खरे आहे .


आमदार कपिल पाटील :   असल्यास , उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय , चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने महारोगी सेवा समितीचे थकीत अनुदान विनाविलंब अदा करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे . 


श्री . राजेश टोपे : महारोगी सेवा समिती , वरोरा , जि . चंद्रपूर या स्वयंसेवी संस्थेचे रुग्णालयीन व पुनर्वसन तत्वावरील सध्या एकूण अनुदान रक्कम रुपये २,९१,०८,००० / - थकीत आहे . अ ) रुग्णालयीन तत्वावरील शासन निर्णय क्र . कुनिका २०२० / प्र.क्र .५२२ / आरोग्य -५ , दिनांक २७ / ० ९ / २०२१ अन्वये ( जानेवारी २०२० ते सप्टेंबर , २०२० ) रक्कम रुपये १,१८,८०,००० / - सन २०२१ २२ च्या मंजूर अनुदानातून वितरीत करण्यात आले आहे . आ ) पुनर्वसन तत्वावरील शासन निर्णय क्र . कुनिका २०२० / प्र.क्र .५०६ / आरोग्य -५ , दिनांक २०/१०/२०२१ अन्वये ( ऑक्टोबर २०१ ९ ते सप्टेंबर , २०२० ) रक्कम रुपये १,४४,००,००० / - सन २०२१-२२ च्या मंजूर अनुदानातून वितरीत करण्यात आले आहे . 


महारोगी सेवा समिती , वरोरा या संस्थेकडून विहीत कालावधीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर न केल्याने निधी वितरण प्रस्ताव अपूर्ण असल्याने मान्यतेसाठी विलंब होत आहे. या अनुषंगाने त्रुटीची पूर्तता करण्याबाबत क्षेत्रिय कार्यालयाकडे शासनस्तरावरुन पत्रव्यवहार सुरु आहे . 


( ५ ) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ? 

( ५ ) प्रश्न उद्भवत नाही .