आमदार चषक कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस संघाला विजेतेपद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०६ डिसेंबर २०२१

आमदार चषक कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस संघाला विजेतेपद

शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)

- जय हिंद मंडळ वरोराद्वारे आयोजित प्रतिभाताई धानोरकर 'आमदार चषक 2021' या खुल्या कबड्डी स्पर्धेत चुरशीच्या अंतीम लढतीत सोनीपत हरीयाना संघावर मात करीत महाराष्ट्र पोलीस संघाने विजेतेपद पटकाविले.

वरोरा येथील कॉटन मार्केटच्या मैदानात तयार करण्यात आलेल्या स्टेडियम मध्ये, वरोरा शहरात पहिल्यांदाच मॅटवर हे सामने खेळविण्यात आले. वरोरा परिसरातील क्रीडा रसिकांनी या सामन्यांना अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
बक्षीस वितरण समारंभ आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. खासदार बाळु धानोरकर, माजी जिल्हा परिषद सभापती प्रकाश मुथा, बाजार समिती सभापती राजेंद्र चिकटे , पंचायत समिती सभापती राजेंद्र धोपटे, डॉ. हेमंत खापणे यांच्या हस्ते पार पडला.
या वेळी नगर परिषदेचे गटनेते गजानन मेश्राम, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, पालीका उपाध्यक्ष अनिल झोटींग, काँग्रेस तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर, नगरसेवक छोटु शेख, राजु महाजन, देवानंद मोरे,सुनील वरखडे,जि.प.सदस्या सुनंदा जिवतोडे, उपसभापती संजीवनी भोयर सरपंच यशोदा खामनकर, महीला काँग्रेस शहराध्यक्षा दिपाली माटे, युवक काँग्रेसचे शुभम चिमुरकर उपस्थित होते.
विजेत्या महाराष्ट्र पोलीस संघास एक लाख रुपये रोख व चषक ,द्वितीय विजेत्या सोनीपत हरियाणा संघास 51 हजार रुपये रोख व चषक व तृतीय विजेत्या एकलव्य नागपूर संघास 25 हजार रूपये रोख व चषक देण्यात आले.
सामन्याच्या यशस्वीतेसाठी प्रवीण काकडे यांच्या मार्गदर्शनात जय हिंद मंडळाचे मार्गदर्शक प्रवीण काकडे, सचिव कासिफ खान, बाबाराव आगलावे ,राजु डोंगरे, परसराम मरसकोल्हे, सुरेंद्र मत्ते, त्रिशूल घाटे, हर्षल आवारी, रामा वाणी, राहुल घाटे व इतर पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न घेतले.

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पुढाकाराने मागील दोन ते तीन वर्षानंतर कबड्डी सामने घेण्यात आले. यामुळे वरोरा येथील क्रीडा रसिकांना पर्वणी मिळाली आहे.