चंद्रपूर जिल्ह्यातील पाच नगरपालिकेत प्रशासक बसणार; नगर विकास मंत्रालयाचा आदेश - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, डिसेंबर २९, २०२१

चंद्रपूर जिल्ह्यातील पाच नगरपालिकेत प्रशासक बसणार; नगर विकास मंत्रालयाचा आदेश


चंद्रपूर जिल्ह्यातील पाच नगरपालिकेत प्रशासक बसणार; नगर विकास मंत्रालयाचा आदेश

डिसेंबर अखेरपर्यंत मुदत संपत असलेल्या नगर परिषदावर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश नगर विकास मंत्रालयाने जारी केले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया होण्यास अडचण निर्माण झाल्याने मुदत संपत असल्याने या नगरसेवकांवर प्रशासक नियुक्त करण्याबाबतचे आदेश निघाले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिदेवाही नगरपंचायत 26 डिसेंबर, बल्लारपूर नगर परिषद 1 जानेवारी, वरोरा नगर परिषद 30 डिसेंबर, मुल नगर परिषद 30 डिसेंबर, तर राजुरा नगरपरिषदेवर 31 डिसेंबरची मुदत संपत आहे. त्यामुळे कार्यकाल संपत असल्याच्या तारखेपासून संबंधित उपविभागीय अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत. यापूर्वीच मुदत संपलेल्या काही ठिकाणी निवडणुका देखील घेण्यात आलेले आहेत. मात्र ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे या काही ठिकाणी त्या जागांवर पुन्हा निवडणूक होणार आहे.

Administrators will sit in five municipalities in Chandrapur district; Order of the Ministry of Urban Development