चंद्रपुरातील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२९ डिसेंबर २०२१

चंद्रपुरातील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

चंद्रपुर मूल मार्गावरील घंटाचौकी जवळ बुधवारी सकाळच्या सुमारास चारचाकी व दुचाकी वाहनात भीषण अपघात झाला असून यात दोघांचा मृत्यू झाला आहे.भीमराव तोडास,सलीम शेख असे मृतकांचे नाव आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मृतक हे चंद्रपुर हुन मूल कडे जात होते अशातच मूल कडून येत असलेल्या चारचाकी वाहनाने दुचाकी ला जोरदार धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली . पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
 #accident #Chandrapur