भिवापूर वार्डातील अमृत पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, डिसेंबर २८, २०२१

भिवापूर वार्डातील अमृत पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन

चंद्रपूर/खबरबात:
शहर महानगरपालिकेमार्फत केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. भिवापूर परिसरातील झोन ८ मधील योजनेचे काम पूर्ण झाले असून, लोकार्पण सोहळा मंगळवार, ता. २८ डिसेंबर रोजी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते पार पडला.

भिवापूर प्रभागातील नरेंद्र लाडेकर यांच्या निवासस्थानी झालेल्या लोकार्पण सोहळ्याला स्थायी समिती सभापती संदीप आवारी, सभागृह नेता देवानंद वाढई, नगरसेविका मंगला आखरे यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील पाईपलाईन उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, नागरिकांच्या घरापर्यंत पाणीपुरवठा सुरु होणार आहे.

मंगळवारी पार पडलेल्या लोकार्पण सोहळ्याला उपअभियंता विजय बोरीकर, शाखा अभियंता संजय जोगी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे विवेक ताम्हण, श्री.भालधरे,स्थानिक नागरिक रमेश लाड,नरेंद्र लाडेकर,नलिनी लाडेकर, वनिता लांजेवार,अश्विनी कोयाडवार,ज्योती लाडेकर,सुमन राचर्लावार,शालिनी लाडेकर,बालीताई पेठे,कैलास लाडेकर,प्रमोद कोयाडवार,शोभा कोयाडवार,आदी नागरिकांची उपस्थिती होती.