- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारत- 75 अंतर्गत तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२३ डिसेंबर २०२१

- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारत- 75 अंतर्गत तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा

 विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करण्यासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे महत्व.....

- रवींद्र रमतकर, संचालक, राज्य विज्ञान संस्था


 - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारत- 75 अंतर्गत तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धाप्राथमिक गटामध्ये कुमारी यशस्वी धिये तर माध्यमिक गटात चेतनकुमार बारंगे प्रथम


बोखारा- राज्य विज्ञान संस्था प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूरचे संचालक रवींद्र रमतकर यांनी उद्घाटनपर भाषण करतांना विद्यार्थ्यांनी एक जागरूक नागरिक होऊन प्रत्येक गोष्टीमध्ये जिज्ञासा ठेवल्यास आपण यशस्वी कसे होऊ शकतो याबाबत मार्गदर्शन करून स्पर्धा परीक्षेचे महत्व विषद केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भारत 75 तालुकास्तरीय प्रश्नमंजूषा 2021 समूहसाधन केंद्र गुमथळा अंतर्गत नारायणा विद्यालयम  कोराडी रोड बोखारा येथे पार पडली.

 कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राज्य विज्ञान संस्था तथा प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूरचे संचालक रवींद्र रमतकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गट विकास अधिकारी किशोर गज्जलवर व प्रमुख अतिथी म्हणून गट शिक्षणाधिकारी राजेशकुमार लोखंडे, नारायणा विद्यालयम बोखाराच्या मुख्याध्यापिका अनुपमा तिवारी, विस्तार अधिकारी शरद भांडारकर, प्रेमा दिघोरे, केंद्रप्रमुख हेमचंद्र भानारकर, रामकृष्ण ढोले, किशोर गमे इत्यादी मंचावर उपस्थित होते.

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन झाले व त्यानंतर रवींद्र रमतकर, संचालक राज्य विज्ञान संस्था तथा प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर यांच्या हस्ते तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा चे उद्घाटन करण्यात आले.


 तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा करिता प्राथमिक गटातून दहा व माध्यमिक गटामध्ये आठ केंद्रांचे विद्यार्थी उपस्थित होते.


 प्राथमिक गटांमध्ये वर्ग 5 ते 8 तिसऱ्या फेरीकरिता तीन विद्यार्थी पात्र ठरले. 


कुमारी यशस्वी योगेश धीये वर्ग सातवा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जामठा (खापरी केंद्र) हिने प्रथम क्रमांक, कुमारी प्रज्ञासिंग जीवतोडे बालाजी कॉन्व्हेंट प्राथमिक शाळा बुटीबोरी (केंद्र बुटीबोरी) द्वितीय क्रमांक तर श्लोक हटवार सत्यसाई विद्यामंदिर नरसाळा (केंद्र विहिरगाव) याने तृतीय क्रमांक पटकाविला.

 यापैकी यशस्वी योगेश धीये ही विद्यार्थीनी जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा करिता पात्र ठरली.


त्यानंतर माध्यमिक गट वर्ग 9ते12 या विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा घेण्यात आली. यामध्ये चेतन राधेश्याम बारंगे सरस्वती भवन कॉन्व्हेंट बोखारा (केंद्र गुमथळा)  प्रथम क्रमांक, मंथन वृषभ अंबुले प्रगती विद्यालय (केंद्र वाडी), पारस हटवार स्वर्गीय दौलतराव ढवळे हायस्कूल नरसाळा (केंद्र विहीरगाव) या दोघांनी समान गुण घेऊन  द्वितीय क्रमांक पटकाविला.


विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

संपूर्ण प्रश्नमंजुषा स्पर्धेचे नियोजन  सोनेगाव निपाणी शाळेच्या विज्ञान विषय शिक्षिका कीर्ती पालटकर, उच्च श्रेणी मुख्याध्यापक संजय नागरे, प्रा. आरती भोरे, प्रा.शिवकुमार दुबे, डॉ.सुवर्णा जांभुळकर यांनी केले.

#azadikamarutmahotsav

 प्रश्नमंजुषा स्पर्धेचे गुण लेखन नारायणा विद्यालयाच्या शिक्षिका गरिमा श्रीवास्तव व शिल्पा दुमडू यांनी केले. कार्तिक पाठक यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाला केंद्रप्रमुख रामकृष्ण ढोले, हेमचंद्र भानारकर, अनिल नासरे,  नरेंद्र हिंगे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिविअ शरद भांडारकर यांनी, सूत्रसंचालन डॉ. सुवर्णा जांभुळकर तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख किशोर गमे यांनी केले.