जटपूरा प्रभाग 7मध्ये सिमेंट रस्त्याचे कामाचे भूमिपूजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२५ डिसेंबर २०२१

जटपूरा प्रभाग 7मध्ये सिमेंट रस्त्याचे कामाचे भूमिपूजन
चंद्रपूर : शहरातील जटपुरा प्रभाग 7 मध्ये डॉ. वासलवार ते पीडब्लूडी क्वॉटर - जनता हायस्कूल सिव्हील लाईनपर्यंत सिमेंट रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन महानगर पालिका स्थायी समिती सभापती संदीप आवारी, झोन सभापती सौ. छबुताई वैरागडे, डॉ. वासलवार, डॉ. राजूरकर यांच्या हस्ते झाले.


चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर राखीताई कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांच्या सहकार्याने मनपा निधीतून डॉ. वासलवार ते पीडब्लूडी क्वॉटर जनता हायस्कुलपर्यंत झोन सभापती सौ. छबुताई वैरागडे यांच्या प्रयत्नांनी सिमेंट कॉक्रीट रोड मंजूर करण्यात आका. त्या रोडचे भूमिपूजन गुरुवार, दिनांक दि. 23/12/2021ला पार पडले. या शुभप्रसंगी डॉ. वासलवार डॉ. सौरभ राजूरकर, विनोद घाटे, संजय चिलके, व्यासदादा, जनता हायस्कूल मुख्याध्यापक, शिक्षकबंधू , मनीषा जोशी, सुनीता उरकुडे, सारिका भुते, मनीषा बरडे, सितोडेताई यांची उपस्थिती होती.